शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

शाळांकडून शासनाच्या अध्यादेशाची पायमल्ली

By admin | Updated: July 8, 2015 01:13 IST

ग्रामीण भागातील पालकांची आर्थिक परिस्थिती गरीबीची असल्याने ग्रामीण भागातील मुली शालेय शिक्षण घेवू शकत नाहीत.

खडसंगी : ग्रामीण भागातील पालकांची आर्थिक परिस्थिती गरीबीची असल्याने ग्रामीण भागातील मुली शालेय शिक्षण घेवू शकत नाहीत. त्यामुळे मुलींना शाळेत दाखल करण्याकरिता पालकांना प्रवृत्त करण्यासाठी तसेच त्यांना शाळेत टिकवून ठेवण्यासाठी शासनाने ५ ते १० वीपर्यंतच्या मुलींसाठी अहल्याबाई होळकर मोफत पास योजना सुरू केली. मात्र यासंदर्भातील अध्यादेशाची अनेक शाळांकडून पायमल्ली करण्यात येत असल्याचा प्रकार कोरा येथील विद्या विकास विद्यालय कोरा व खडसंगी येथील ग्रामदर्शन महाविद्यालय प्रशासनाने केलेल्या तक्रारीमुळे उजेडात आला आहे.ग्रामीण भागातील इयत्ता पाचवी ते दहावीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थीनींना शाळेत जाण्यासाठी एसटीने मोफत पास योजना (शासन निर्णय क्रमांक एफइडी १०९६/ १०९६/८४८८३/१९५७/९६ आशी-५) सुरू करण्यात आली. या निर्णयानुसार मोफत पास सवलत फक्त ग्रामीण भागातील मुलींनाच देय असून ज्या गावात माध्यमिक शिक्षणाची सोय आहे, त्या गावातील विद्यार्थीनींना दुसऱ्या गावात शिक्षणासाठी जाताना ही मोफत पास सवलत देण्यात येणार नाही, असे स्पष्ट निर्देश आहेत. मात्र या अध्यादेशाची पायमल्ली अनेक शाळांकडून करण्यात येत आहे. त्यामुळे शासनाला लाखो रुपयांचा चुना लागत आहे.चिमूर पंचायत समितीअंतर्गत येणाऱ्या खडसंगी येथील ग्रामदर्शन विद्यालयात इयत्ता पाचवी ते १२ वीपर्यंत इंग्रजी माध्यमाची शिक्षणाची सोय आहे. मात्र याच गावातील गावाजवळील भान्सुली, सोनेगाव (वन), रेगांबोडी, बदर या गावातील विद्यार्थीनी खडसंगीची शाळा ओलांडून बोथली व चिमूर येथे शिक्षणासाठी जातात तर वर्धा जिल्ह्यातील कोरा येथे विद्या विकास विद्यालयमध्ये इयत्ता १२ वीपर्यंत शिक्षणाची व्यवस्था असतानाही येथील विद्यार्थीनी आमडी (बे) येथील साईबाबा विद्यालयात शिक्षणासाठी येतात.खडसंगी व कोरा येथे शाळा असतानाही या परिसरातील विद्यार्थीनी दुसऱ्या गावात शिक्षणासाठी जातात. यासाठी शासनाच्या अहल्याबाई होळकर मोफत पास योजनेचा लाभही घेतात. त्यामुळे या शाळांकडून शासनाच्या त्या अध्यादेशाचा दुरूपयोग करण्यात येत असल्याने शासनाला लाखो रुपयाचा चुना या शाळांकडून लावल्या जात आहे. (वार्ताहर)