शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षिकेच्या बदलीसाठी विद्यार्थ्यांचा शाळेवर बहिष्कार

By admin | Updated: July 24, 2015 01:03 IST

मागील सत्रात शिक्षिकीने शिकविले नाही, उत्तर पत्रिका तपासल्या नाही, त्यामुळे निकाल निकालाच्या दिवशी मिळाला नाही.

आंदोलनाचा दुसरा दिवस : शिक्षण विभाग दखल घेईनावरोरा : मागील सत्रात शिक्षिकीने शिकविले नाही, उत्तर पत्रिका तपासल्या नाही, त्यामुळे निकाल निकालाच्या दिवशी मिळाला नाही. सदर शिक्षिकेची बदली करावी, या मागणीसाठी बुधवारी पालकांनी शाळेवर धडक दिली. आज दुसऱ्या दिवशीही विद्यार्थ्यांनी शाळेवर बहिष्कार टाकला.वरोरा तालुक्यातील भटाळा येथील जिल्हा परिषद विद्यालयात इयत्ता ५ ते ८ वीचे वर्ग असून भटाळा, आसाळा, कोटबाळा आदी गावातील १९० विद्यार्थी शिक्षण घेत आहे. मात्र शिक्षिकेने मागील सत्रात नियमित तासिका घेतल्या नाही व निकालाच्या दिवशीपर्यंत उत्तरपत्रिका तपासून दिल्या नाही. त्यामुळे हे प्रकरण शेगाव पोलिसापर्यंत गेले होते. या शिक्षिकेची बदली करण्याकरीता पालकांनी लेखी निवेदन दिले. परंतु शिक्षिकेची बदली झाली नाही.त्यामुळे संतप्त झालेल्या पालकांनी २२ जुलै रोजी शाळेवर धडक देवून शाळेतील आपल्या पाल्यांना बाहेर काढून घेतले. यावेळी पंचायत समिती संवर्ग विकास अधिकारी के.के. ब्राम्हणकर व गटशिक्षणाधिकारी रामराव चव्हाण यांनी भेट देवून संतप्त पालकांशी चर्चा केली व माध्यमिक शिक्षणाधिकारी रमाकांत देशपांडे यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क करुन सदर शिक्षिकेची २५ जुलैपर्यंत बदलीचे आश्वासन दिले. त्यानंतरही जोपर्यंत शिक्षिकेची बदली करणार नाही. तोपर्यंत मुलांना शाळेत पाठविणार नाही, अशी भूमिका पालकांनी घेत गुरूवारी दुसऱ्या दिवशीही मुलांना शाळेत पाठविले नाही. (तालुका प्रतिनिधी)मुख्याध्यापक विनापरवानगी रजेवरजिल्हा परिषद विद्यालय भटाळाचे मुख्याध्यापक टी.ओ. भोयर १३ ते १७ जुलैपर्यंत रजेवर असल्याचा अर्ज शाळेत होता. परंतु शाळेत २२ जुलै रोजी संवर्ग विकास अधिकारी के.के. ब्राम्हणकर व गटशिक्षणाधिकारी रामराव चव्हाण यांनी भेट दिली, तेव्हा मुख्याध्यापक उपस्थित नव्हते. रजेवर जातांना वरिष्ठ कार्यालयाला कळविले नाही. यासंदर्भात गटशिक्षणाधिकारी रामराव चव्हाण यांच्याशी संपर्क साधला असता, भेटी दरम्यानच्या दिवशीचा मुख्याध्यापकाच्या रजेचा अर्ज नसल्याने त्या दिवशीचे वेतन कापण्याचे निर्देश बीडीओने दिले असल्याचे सांगितले.