शहरं
Join us  
Trending Stories
1
Rohini Khadse : "प्रत्येक गोष्टीला वेळ..."; रेव्ह पार्टीमध्ये पतीला अटक झाल्यावर रोहिणी खडसेंची पहिली प्रतिक्रिया
2
माकडांनी उड्या मारल्या, तार तुटली अन्...; अवसानेश्वर महादेव मंदिरात कशी झाली चेंगराचेंगरी?
3
शिंदेसेनेच्या मंत्र्यांना बदनाम करण्याचा कट रचला जातोय का?; रामदास कदमांनी व्यक्त केली शंका
4
Share Market Today: शेअर बाजाराची घसरणीसह सुरुवात; Sensex २६० अंकांनी घसरला, 'हे' स्टॉक्स आपटले
5
कुणाची किती ताकद हे कळू द्या, एकटे लढून दाखवा; भाजपाचा स्वबळाचा नारा, शिंदेसेनेला आव्हान?
6
बाराबंकीच्या अवसानेश्वर महादेव मंदिरात चेंगराचेंगरी; दोघांचा मृत्यू, ४० जण जखमी
7
रेपो रेट कपातीचा फायदा वाहन कर्जांना देत नाहीत; खासगी बँकांविरोधात फाडाची रिझर्व्ह बँकेकडे तक्रार
8
IND vs ENG : 'गंभीर' मुद्दा! गिलला कदाचित कुलदीपला खेळवायचे होते, पण... गावसकरांचा रोख कुणाकडे?
9
"योगीजी, या लोकांना सोडू नका"; कॉन्स्टेबलच्या पत्नीचा सासरच्यांकडून अमानुष छळ, संपवलं जीवन
10
"तू सिंगल आहेस का?" रिंकू राजगुरूला चाहत्याचा प्रश्न, अभिनेत्रीने रिलेशनशिप स्टेटसच सांगितलं, म्हणाली...
11
बिग ब्रेकिंग! TCS कंपनी १२ हजारपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढणार; कुटुंबावर मोठं संकट
12
शत्रूसाठी कोणतेच स्थान सुरक्षित नाही हे ‘ऑपरेशन सिंदूर’ने सिद्ध केले: पंतप्रधान नरेंद्र मोदी
13
ठाकरे बंधू पुन्हा भेटले, मनसे-उद्धवसेना युती चर्चांना उधाण; पक्षप्रवेशाचे इनकमिंग थंडावले
14
आजचे राशीभविष्य २८ जुलै २०२५ : प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल
15
वरळीतील  कार्यक्रमात अमित ठाकरे हजर; आदित्य ठाकरेंची पाठ, ज्युनियर ठाकरे एकत्र यायचा योग नाही
16
गोंधळानंतर संसदेत आजपासून पुन्हा चर्चा तापणार; ‘ऑपरेशन सिंदूर’वर सत्ताधारी-विरोधक आमने-सामने
17
महाराष्ट्रातील खासदारांना संसदरत्न; संसदीय कामकाज मंत्री किरीन रिजीजू यांच्या हस्ते पुरस्कार
18
वीजप्रवाह उतरल्याच्या अफवेमुळे पळापळ; हरिद्वारच्या मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी
19
११व्या शतकातील शिवमंदिरावरून उफाळला थायलंड-कंबोडिया संघर्ष; नेमके प्रकरण काय, वाद का वाढला?
20
थायलंड-कंबोडिया अखेर शस्त्रसंधीसाठी तयार; ट्रम्प यांची मध्यस्थी, सीमेवर अद्यापही तणाव कायम

निसर्गरम्य सिंधबोडी तलाव पर्यटन दृष्टीने उपेक्षितच

By admin | Updated: May 11, 2014 00:08 IST

सिंदेवाही तालुका समृद्ध वनवैभवांनी नटलेला आहे. याच तालुक्यात सिंधबोडी तलाव आहे. तलावाच्या सभोवताल घनदाट जंगल आहे.

बाबुराव परसावार - सिंदेवाही

सिंदेवाही तालुका समृद्ध वनवैभवांनी नटलेला आहे. याच तालुक्यात सिंधबोडी तलाव आहे. तलावाच्या सभोवताल घनदाट जंगल आहे. नानाविध वन्यप्राणी व पक्षी या तलावात येतात. विदेशी पक्षीही या ठिकाणी अनेकदा येऊन जातात.अगदी ताडोबासारखे हे ठिकाण असतानाही वनविभागाने कधी सिंंधबोडी तलावाचा परिसर पर्यटन क्षेत्र म्हणून विकसित करण्याचे सौजन्य दाखविले नाही. त्यामुळे त्याचा पर्यटन विकास आराखडा तयार झाला नाही. हे ठिकाण उपेक्षितच राहिले. पर्यटन क्षेत्र म्हणून या तलावाला दर्जा देण्याची गरज सध्या वन्यप्रेमींकडून व्यक्त केली जात आहे. सिंदेवाही वनपरिक्षेत्रातील कचेपार जंगलातील कक्ष क्रमांक १३५(अ) मध्ये सिंधबोडी तलावाचा परिसर हे एक रमणीय स्थळ आहे. सिंदेवाहीपासून १० किलोमीटर अंतरावर कचेपार गाव घनदाट जंगलात आहे. कचेपारपासून पुर्वेस पाच कि.मी. अंतरावर सिंधबोडी तलाव आहे. हे ठिकाण जंगलाच्या मध्यभागी असून याला लागून खैरी व पवनपार तलाव आहेत. त्यामुळे सिंधबोडी तलावात भरपूर पाण्याचा साठा उपलब्ध आहे. तसेच तलावाला लागून डोंगर असल्यामुळे या ठिकाणी वन्यप्राण्यांना राहण्यासाठी नैसर्गिक वातावरण निर्माण झाले आहे. या तलावाच्या परिसरात मुक्तपणे हिंडणारे पशुपक्षी व वनराई पाहून मन प्रसन्न होते. तलावाच्या सानिध्यात वनराईने नटलेला व विस्तारलेला हा परिसर आहे. येथे मोठ्या संख्येने तृणभक्षी, मासभक्षी, वन्यप्राण्याशिवाय सरपटणारे प्राणी, औषधोपयोगी वनस्पती व प्रचंड वृक्ष यांची समृद्धता आहे. या परिसरात रानगवे, हरिण, सांबर, चितळ, भेडकी आदी तृणभक्षी प्राणी यांचा वावर आहे.या जंगलात साग, एन, बिजा,मोह, सालई, धावडा, किन्ही, पळस, आंजन, आवळा, हिरडा, बेहडा, चारोळी व इतर फळझाडाचा समावेश आहे.या तलावात परदेशी पाहुणे लाल तोंडाचा करकोचा, पांढरा बगडा, बारडी, पानकवडी, आस्ट्रेलियन पक्षी व इतर विविध प्रकारचे पक्षी पाण्यात विहार करताना आढळून येतात. तसेच हरिण, सांबर, चितळ, चौरसिंग, भेडकी, माकड, रानगवे, रानडुक्कर, ससा, आस्वल याचे कळप याशिवाय मोर, लांडोर, लावे, तितीर यांचा आवाज नेहमीच येत राहतो. लांब पिसारा असलेले मोर मनसोक्त फिरताना आढळून येतात. तसेच सायंकाळी पट्टेदार वाघ, बिबट, तडस, रानमांजर, रानकुत्रे व कोल्हा शिकारीच्या शोधात जंगलात भटकत असतात. या परिसरात वनविभागाच्या कर्मचार्‍यांनी पक्षासाठी खाद्य म्हणून ‘देवधान’ या भात पिकाची लागवड केली आहे. त्यामुळे येथे विविध प्रकारचे पक्षी पाहावयास मिळतात. या तलावावर सर्व प्रकारचे वन्यप्राणी पाणी पिण्याकरिता येतात. या ठिकाणी २४ तास वनकर्मचारी राहत असल्याने व ठिकठिकाणी कॅमेरा लावल्याने अवैध शिकारीवर प्रतिबंध झालेला आहे. इको टुरिझम व जंगल सफारीसारखे पर्यटकांना आकर्षित करणारे विविध उपक्रम राबविल्यास हे ठिकाण जंगल पर्यटन क्षेत्र म्हणून विकसित होऊ शकते. परंतु तसा प्रयत्नच आजवर करण्यात आलेला नाही. या क्षेत्राला उपेक्षितच ठेवण्यात आले आहे.