शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
2
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
3
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती आहे UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
4
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
5
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
6
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
7
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
8
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
9
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
10
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
12
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
13
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
14
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
15
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
16
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
17
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
18
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
19
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
Daily Top 2Weekly Top 5

कॅण्डल मार्च काढून दिला शांततेचा संदेश

By admin | Updated: September 14, 2015 00:42 IST

नजीकच्या नांदा येथील समाजसेवक व राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचारांचे प्रचारक डॉ. देवराव पांडुरंग जोगी (६२) व त्यांची पत्नी सुधा जोगी (५५) ....

जोगी दाम्पत्य हत्याकांड : शेकडो लोकांचा सहभाग गडचांदूर : नजीकच्या नांदा येथील समाजसेवक व राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचारांचे प्रचारक डॉ. देवराव पांडुरंग जोगी (६२) व त्यांची पत्नी सुधा जोगी (५५) या दाम्पत्याची ३१ आॅगस्टला रात्री ९ वाजताच्या दरम्यान अज्ञात हल्लेखोरांनी निर्घृण हत्या केली. १३ दिवस उलटले मात्र अद्याप आरोपींचा शोध लागला नाही. त्यामुळे नांदा गावात अजूनही दहशत कायम आहे. गुरुवारी गुरुदेव सेवा मंडळ व ग्रामवासीयांच्या वतीने नांदा ते नांदाफाटा चौकापर्यंत कॅण्डल मार्च काढून शांततेचा संदेश दिला. नांदाफाटा येथील चौकात सामूहिक श्रद्धांजली देण्यात आली. यावेळी शेकडो गुरुदेव भक्त व गावकरी उपस्थित होते.पोलिसांचा तपास योग्य दिशेने सुरु असून आरोपींना पकडण्यात लवकरच यश येईल, असा विश्वास पोलीस अधीक्षक संदीप दिवाण यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला होता. पोलीस योग्य तपास करीत असले तरी आरोपीपर्यंत पोहचण्यास बराच विलंब झाला आहे. त्यामुळे आरोपी सापडतील की, नाही अशी भावना जनतेत निर्माण झाली आहे. पोलिसांच्या हाती अजूनही काही ठोस पुरावे लागले नसल्याची माहिती आहे. त्यामुळे गावकऱ्यांत रोष असून आरोपींना अटक करण्याची मागणी आहे. (शहर प्रतिनिधी)गावात दहशत कायमनेहमी रात्री ११-१२ वाजेपर्यंत जागणारे नांदावासी आता ९ वाजताच झोपतात. गावकऱ्यांनी इतकी सुन्न करणारी घटना आयुष्यात कधी बघितली नाही. सायंकाळी ९ वाजता वर्दळीच्या ठिकाणी घडलेल्या या घटनेमुळे गावावर भीतीचे सावट आहे. आरोपी पकडेपर्यंत गावकरी सुखाची झोप घेणार नसल्याचे दिसते.