शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
4
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
5
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
6
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
7
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
8
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
9
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
10
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
11
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
12
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
13
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
14
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
15
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
16
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
17
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
18
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
19
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
20
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
Daily Top 2Weekly Top 5

वाघांच्या अधिवासात रेती तस्करांचा धुडगूस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2021 04:29 IST

नीलेश झाडे गोंडपिपरी : वाघांसाठी नंदनवन ठरलेल्या कन्हाळगाव अभयारण्यात आता रेती तस्करांचा धुडगूस सुरू झाला आहे. अभयारण्यात येणाऱ्या नाल्यातून ...

नीलेश झाडे

गोंडपिपरी : वाघांसाठी नंदनवन ठरलेल्या कन्हाळगाव अभयारण्यात आता रेती तस्करांचा धुडगूस सुरू झाला आहे.

अभयारण्यात येणाऱ्या नाल्यातून वाहनांनी रेतीची चोरी केली जात आहे. रात्रीच्या वेळी सुरू असलेल्या या प्रकाराने वन्यजीवांची सुरक्षा धोक्यात आली आहे. या प्रकारावर वन्यजीवप्रेमींकडून संताप व्यक्त केला जात असताना वनविकास महामंडळाने चुप्पी साधली आहे.

गोंडपिपरी तालुका वनवैभवाने संपन्न आहे. येथे मोठ्या प्रमाणावर खनिज संपत्ती आहे. ही खनिज संपत्ती लुटण्यासाठी तस्करांचे मोठे जाळे तालुक्यात आहे. सध्या गोंडपिपरी, धाबा, सुकवासी येथे मार्गाचे काम सुरू आहे. मार्गाच्या कामात अनेक ठिकाणी पाईपलाईनचे कामे करण्यात येत आहे. या कामासाठी लागणारी रेती तस्कर लगतच्या चिवंडा येथील जंगलातील नाल्यातून उपसत आहेत. अगदी कमी वेळात रेती उपलब्ध होत असल्याने हे काम करणारे कंत्राटदारदेखील चिवंडा येथील नाल्यातील तस्करी केलेल्या रेतीला पसंती देत आहेत.

गोंडपिपरी तालुक्यातील कन्हाळगावला शासनाने नुकतेच अभयारण्य घोषित केले आहे. कन्हाळगाव अभयारण्यात येत असलेला चिवंडा जंगल हे वाघांच्या अधिवासासाठी अतिशय उपयुक्त आहे. या भागात अनेक वाघांचा अधिवास आहे. याच चिवंडा येथील जंगलातील नाल्यातून रात्री तस्कर रेतीचा मोठ्या प्रमाणावर उपसा करीत आहेत.

बॉक्स

रात्रभर वाहनांची रेलचेल

रात्रभर येथे मोठ्या प्रमाणावर वाहनांची ये जा असल्याने येथील वाघांची पुरती झोप उडाली आहे. शिवाय वाघांच्या सुरक्षेसाठीही अतिशय घातक बाब आहे. हा भाग सध्या वनविकास महामंडळात मोडतो. पण या तस्करीकडे वनविभागाचे पुरते दुर्लक्ष होत आहे. तालुका प्रशासनाने या तस्करांना आशीर्वाद दिला की काय, अशी परिस्थिती झाली आहे. एकीकडे वन्यजीवांच्या सुरक्षेकरिता वरिष्ठ स्तरावरून मोठमोठ्या योजना प्रशासनाकडून करण्यात येत आहेत. मात्र दुसरीकडे स्थानिक प्रशासनाच्या आशीर्वादाने वन्यजीवांपुढे नवीनच संकट उभे ठाकले आहे. याप्रकरणी वरिष्ठांनी लक्ष द्यावे व वन्यजींवांना दिलासा द्यावा, अशी मागणी तालुक्यातील वन्यजीवप्रेमींनी व्यक्त केली आहे.

कोट

कन्हाळगाव अभयारण्यातून झालेल्या रेती चोरीच्या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश वनपरिक्षेत्राधिकाऱ्यांना दिले आहे. येत्या दोन दिवसात मी प्रत्यक्ष या प्रकाराची पाहणी करणार आहे. दोषी असलेल्यांवर कार्यवाही केली जाईल.

- आर्या,

विभागीय व्यवस्थापक,

मध्य चांदा वनविकास महामंडळ.