शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

गोंडपिपरीतील शिवाजी चौक बनला वाळू माफियांचा अड्डा

By admin | Updated: July 12, 2014 01:07 IST

खनिज संपत्तीने नटलेल्या गोंडपिपरी तालुक्यात वाळू माफियांचे साम्राज्य चांगलेच पसरले असून प्रशासनाच्या डोळ्यात धूळ झोकून वाळूची अवैधरित्या तस्करी जोमाने सुरू आहे.

चंद्रपूर : खनिज संपत्तीने नटलेल्या गोंडपिपरी तालुक्यात वाळू माफियांचे साम्राज्य चांगलेच पसरले असून प्रशासनाच्या डोळ्यात धूळ झोकून वाळूची अवैधरित्या तस्करी जोमाने सुरू आहे. याकडे महसूल प्रशासनाचे होत असलेले दुर्लक्ष व पोलीस प्रशासनाच्या आशिर्वादाने दररोज शासनाला लाखो रुपयांचा चुना लागत आहे. या तस्करांनी गोंडपिपरीतील शिवाजी चौकाला आपला अड्डा बनविले असून येथूनच वाळू तस्करीचे नियोजन केले जात आहे. प्रशासनाच्या कारवाईला दिरंगाई होत असल्याने वाळू माफियांचे फावत असून दिवसागणिक वाळूच्या तस्करीला पाठबळ मिळत असल्याचेही बोलल्या जात आहे.गोंडपिपरी तालुका उद्योगविरहित असल्याने तालुक्यात वाळूची मागणी कमी आहे. परंतु तालुक्यातून वाहणाऱ्या नद्यांतील वाळू चांगल्या दर्जाची असल्याने राजुरा, गडचांदूर, कोरपना, चंद्रपूर, बल्लारपूर शहरातून वारंवार वाळूची मागणी होत असल्याने गोंडपिपरी तालुक्यातील वाळू तस्कर कर्मचाऱ्यांना चिरमिरी देऊन वाळू तस्करीचा धंदा करीत आहेत. तालुक्यातील राजकारणी, ठेकेदार व प्रशासनातील कर्मचाऱ्यांचे नातेवाईक या धंद्यात गुंतले असल्याची चर्चा असून दररोज लाखो रुपयांची वाळू चोरीला जात आहे.गोंडपिपरी येथील शिवाजी चौक वाळू माफियांचा अड्डा बनले आहे. या चौकातील टपऱ्यावर बसून वाळू तस्करीचे नियोजन केल्या जात आहे. वाळू तस्करीसाठी वढोली, खरारपेठ मार्गाचा उपयोग केला जात असून मार्गालगतच जंगलाचा भाग विस्तारला आहे. त्यात अनेक वन्यप्राण्यांचा वावर असून त्यांच्या जिवाला यापासून धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांत या मार्गावर शिकारीचे प्रमाण वाढले आहे. वाळू तस्करीला गेलेल्या गाड्या जंगलात उभ्या करून गाडीच्या लाईटाच्या साहाय्याने वन्यप्राण्यांची शिकार करीत असल्याचे बोलल्या जात आहे. गोंडपिपरीचे उपविभागीय अधिकारी चंद्रभान पराते रूजू होताच, वाळू तस्करीला आळा बसला होता. परंतु त्यांच्याकडे चंद्रपूर निवासी जिल्हाधिकाऱ्याचा प्रभार देण्यात आला असल्याने वाळू माफियांचे फावत असून रोज शेकडो ब्रास वाळू लंपास केली जात आहे. त्यामुळे शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडत आहे. (प्रतिनिधी)