शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

महाकालीच्या दरबारात दीड महिन्यापासून सामसूम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2020 00:49 IST

लोकमत न्यूज नेटवर्क चंद्रपूर : कोरोना संसर्ग रोखण्यासाठी ऐतिहासिक महाकाली मंदिर दीड महिन्यापासून भाविकांसाठी बंद ठेवण्यात आले आहे. यावर्षी ...

ठळक मुद्देलॉकडाऊनचा परिणाम : लघु व्यावसायिकांच्या उदरनिर्र्वाहाचा प्रश्न

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : कोरोना संसर्ग रोखण्यासाठी ऐतिहासिक महाकाली मंदिर दीड महिन्यापासून भाविकांसाठी बंद ठेवण्यात आले आहे. यावर्षी चैत्र महिन्यातील यात्राही जिल्हा प्रशासनाच्या सूचनेवरून रद्द करण्यात आली. त्यामुळे पुजेचे साहित्य तसेच अन्य वस्तु विकणाऱ्या व्यावसायिकांचे कोट्यवधींचे नुकसान झाले आहे. मागील अनेक वर्षांपासून व्यवसाय करणाऱ्यांनी बँकांकडून कर्ज घेतले होते. परंतु, संपूर्ण व्यवसाय बंद असल्याने उदरनिर्वाहाचा प्रश्न त्यांच्यासमोर उभा ठाकला आहे.कोरोना विषाणू संसर्गामुळे संपूर्ण देशात लॉकडाऊन सुरू आहे. गर्दी टाळण्यासाठी महाराष्ट्रातील मंदिरासह, सर्व धार्मिक स्थळे बंद ठेवण्यात आली. यामध्ये महाकाली मंदिराचाही समावेश आहे. भाविकांसह हळदी-कुंकवाचे दुकाने, फिरते व्यावसायिकांनी गजबजलेला परिसर सध्या ओस दिसत आहे. महाकाली देवीच्या मंदिरावर अवलंबून असलेल्या व्यावसायिक व त्यांच्याकडे काम करणारे शंभरहून अधिक कामगारांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. महाकाली मंदिर बंद असल्याने बांगड्या विकणाऱ्या महिला व फिरते विक्रेत्यांच्या हाताला काम नाही. माता महाकाली मंदिरात दरदिवशी शेकडो भाविक दर्शनासाठी येतात. यामध्ये विदर्भातील गडचिरोली, भंडारा, नागपूर, गोंदिया, यवतमाळ, वर्धा, अमरावती जिल्ह्यातील भाविकांची संख्या लक्षवेधी असते.गाभाऱ्यातच पूजानांदेड जिल्ह्यातून हजारो भाविक चैत्र यात्रेसाठी येतात. कोरोनाचा प्रादूर्भाव वाढण्यापूर्वी महाकाली मंदिर व्यवस्थापनाने यात्रेची तयारी केली होती. दरम्यान, राज्यात कोरोनाचा रूग्ण आढळल्यानंतर यात्रा होणार की नाही, याविषयी नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. राज्य शासनाने सार्वजनिक कार्यक्रमांवर बंदी घालण्याचा निर्णय जाहीर केला. त्यामुळे जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी मंदिर व्यवस्थापनाची बैठक घेतली. याबैठकीत यात्रा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. तेव्हापासून मंदिराची दारे बंद आहेत. मंदिर परिसराची नियमित स्वच्छता केली जात असून केवळ गाभाऱ्यात पूजा केली जाते.जिल्हा प्रशासनाच्या सूचनेनुसार चैत्र यात्रा भरविण्यात आली नाही. कोरोना प्रतिबंधासाठी देशभरात लॉकडाऊन सुरू झाले. व्यवस्थापनाकडून त्याचे पालन केले जात आहे. याचाच भाग म्हणून मंदिर व्यवस्थापनाकडून जिल्हा प्रशासनाला मदत निधी देण्यात आला आहे.- सुनील नामदेव महाकाले, अध्यक्ष महाकाली मंदिर ट्रस्ट, चंद्रपूर

टॅग्स :Mahakali Mandirमहाकाली मंदिर