शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
2
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
6
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
7
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
8
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
9
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
10
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
11
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
12
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
13
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
14
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
15
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
16
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
17
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
18
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
19
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
20
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
Daily Top 2Weekly Top 5

तळोधीचे स्मशानघाट पाणी टंचाईच्या सावटाखाली

By admin | Updated: April 30, 2016 00:59 IST

पाणी टंचाईचा सामना केवळ गावांना नाही तर स्मशानघाटांनाही करावा लागत आहे. नाल्याजवळ असलेल्या स्मशानाना ही समस्या मोठ्या प्रमाणावर भेडसावत आहे.

प्रशासनाचे दुर्लक्ष : अंत्यसंस्कारासाठी येणाऱ्या नागरिकांचे हालघनश्याम नवघडे नागभीडपाणी टंचाईचा सामना केवळ गावांना नाही तर स्मशानघाटांनाही करावा लागत आहे. नाल्याजवळ असलेल्या स्मशानाना ही समस्या मोठ्या प्रमाणावर भेडसावत आहे. तळोधी येथे तर गेल्या अनेक दिवसांपासून ही समस्या निर्माण झाली आहे.तळोधी हे १५ हजार लोकसंख्येचे गाव असून येथे तळोधीच्या नावे एक आणि बाम्हणीच्या नावे एक असे दोन स्मशानघाट आहेत. हे दोन्ही स्मशानघाट जवळजवळ असून गावापासून दोन किलोमिटर अंतरावर बोकडडोह नाल्यावर आहेत. या दोन पैकी बाम्हणी स्मशानभूमीवर तळोधी ग्रामपंचायतीने एक विंधन विहिरीची व्यवस्था केली असली तरी या विंंधन विहीरीचा दांडा गेल्या अनेक दिवसांपासून तुटला असलञयाने ही विंधन विहीर बंद पडून आहे.तळोधी स्मशानघाटावर विंधन विहिरीची व्यवस्था नसली तरी ग्रामपंचायतीने या ठिकाणी पाण्याची छोटी टाकी तयार करुन त्यावर नळकांडे लावले होते. पण हे नळकांडेसुद्धा अनेक दिवसांपासून बंद आहेत. तळोधी हे १५ हजार लोकसंख्येचे शहर आहे. रोज येथे कोणाचा ना कोणाचा मृत्यू होत असतो. त्यामुळे तळोधीवासियांना रोजच या स्मशानघाटावर जावे लागते.हे स्मशानघाट बोकडडोह नाल्यावर असले तरी यावर्षी कमी पावसामुळे हा नाला कोरडा पडला आहे. त्यामुळे अंत्यविधी करणाऱ्या व अंत्यविधीसाठी आलेल्या नागरिकांची पाण्याविणा मोठीच परवड होत आहे. श्रीमंत व्यक्तीच्या घरचा अंत्यविधी असेल तर हे लोक पाण्याच्या कॅनची व्यवस्था करतात. पण गरीब व साधारण लोकांचे काय? असा प्रश्न यानिमित्ताने विचारला जात आहे.नाला कोरडा पडल्याने आणि बाम्हणी स्मशान घाटाची विंधन विहिर बंद असल्याने केवळ पिण्याच्या पाण्याचाच प्रश्न निर्माण झाला नाही तर अंत्यविधिनंतर करण्यात येणाऱ्या विधिसाठी सुद्धा जे पाणी आवश्यक असते त्या पाण्यासाठी भटकावे लागत आहे. तळोधी ग्रामपंचायतीने केवळ सिमेंटचे रस्ते तयार करण्यात व्यस्त न राहता गेल्या दिड वर्षापासून बाम्हणी स्मशान घाटात बंद असलेल्या हातपंपाकडे व तळोधी स्मशानघाटावरील बंद नळकांड्याकडे लक्ष देण्याची गरज आहे.स्मशानभूमीतील जलस्रोतांची काळजी घेणे ग्रामपंचायतीचे कर्तव्य आहे. पण या कर्तव्याकडे ग्रामपंचायतीने दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे अशी परिस्थितीनिर्माण झाली.- प्रा. उपेंद्र चिटमलवार, अध्यक्ष, तंमुस, तळोधीयाबद्दल तक्रारी आल्या आहेत. ग्रा.पं.च्या मार्फत ही समस्या निकाली काढण्याचा प्रयत्न त्वरित केल्या जाईल.- विलास लांजेवार, सदस्य ग्रा.पं. तळोधी