शहरं
Join us  
Trending Stories
1
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
2
Latest Marathi News LIVE Updates: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकातामध्ये ED ची मोठी कारवाई
3
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
4
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, जाणून घ्या एका रात्रीचं भाडं
5
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
6
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
7
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
8
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
9
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
10
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
11
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
12
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
13
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
14
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
15
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
16
Food : आशियातील टॉप-५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची दोन 'रत्न'; एक तर आपल्या मुंबईतच! बहुतेक मुंबईकरांनाही माहीत नसेल...
17
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
18
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
19
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
20
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
Daily Top 2Weekly Top 5

परवान्याविना खाद्यपदार्थांची विक्री

By admin | Updated: September 6, 2015 00:57 IST

चंद्रपुराची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. तशी व्यावसायिक प्रतिष्ठानेही वाढत आहे.

अटींची पूर्तता गरजेची : हातठेल्यांवर कुणाचाच वॉच नाहीचंद्रपूर : चंद्रपुराची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. तशी व्यावसायिक प्रतिष्ठानेही वाढत आहे. मागील काही वर्षात चंद्रपुरात हॉटेल्स, रेस्टारंटचीही संख्या वाढली आहे. मात्र यातील बहुतांश हॉटेल्समधून परवान्याविनाच खाद्य पदार्थांची विक्री सुरू असल्याची माहिती आहे. अनेकांनी परवाना नुतनीकरण न करताच हा व्यवसाय सुरू ठेवला आहे. खाद्य पदार्थाचा थेट संबंध आरोग्याशी असतो. त्यामुळे खाद्य पदार्थांची विक्री करताना अनेक निकषाची पूर्तता करावी लागते. मात्र या भानगडीत हॉटेल व्यावसायिक पडताना दिसत नाही. मागील काही वर्षात उत्पन्नाचे चांगले स्रोत म्हणून हॉटेल थाटून अनेक जणांनी आपले बस्तान मांडले आहेत. पाच महिन्यांपूर्वी चंद्रपुरात दारूबंदी लागू करण्यात आली. त्यानंतर अनेक बार अ‍ॅन्ड रेस्टारंटधारकांनी ‘बार’ शब्द काढून रेस्टारंट सुरूच ठेवले आहे. या रेस्टारंटमधून खाद्य पदार्थाची विक्री केली जाते. नागरिकांच्या आरोग्याशी निगडीत हा विषय असल्याने अशा हॉटेल्समध्ये स्वच्छतेची काळजी घेतली जाते की नाही, वाहनतळ आहे की नाही, हे तपासून महानगरपालिकेकडून प्रमाणपत्र दिले जाते. त्यानंतर अन्न व औषध प्रशासनाकडून काही अटींची पूर्तता केल्यानंतर त्यांना परवाना दिला जातो. एवढे सर्व करूनही जिल्हाधिकारी कार्यालयातून इटींग परवानाही या हॉटेल्सधारकांना घ्यावा लागतो. हे परवाने दरवर्षी नूतनीकरण करून घ्यावे लागतात. मात्र चंद्रपूर शहरातील अनेक हॉटेल्सधारकांनी इटींग परवाना नुतनीकरणच केलेला नाही. परवाना नसतानाही अशा हॉटेल्समधून सर्रास खाद्य पदार्थांची विक्री केली जात आहे. इटींग परवाना मिळविण्यासाठी काही कागदपत्रांची व अटींची पूर्तता करावी लागते, हे विशेष. (शहर प्रतिनिधी)जिल्हाधिकाऱ्यांनी बजावली नोटीसपरवान्याशिवाय चंद्रपुरात हॉटेल्सधारकांकडून खाद्य पदार्थांची विक्री केली जात असल्याची बाब जिल्हाधिकारी यांच्याही लक्षात आली आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी यांनी शहरातील तब्बल १२५ हॉटेल्समालकांना नोटीस बजावून परवाना तत्काळ नूतनीकरण करून घेण्याची सूचना केली आहे. अन्यथा कायदेशिर कारवाई केली जाणार आहे. हातठेल्यांकडे सर्वांचेच दुर्लक्षचंद्रपुरात रस्त्यारस्त्यांवर हातठेल्यांमधून खाद्य पदार्थांची विक्री केली जात आहे. त्यानंतर उघड्यावरच हे पदार्थ ठेवले जातात आणि विकलेही जातात. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने हे खाद्य पदार्थ खाऊन नागरिकांचे आरोग्य बिघडू शकते. असे असतानाही याकडे महानगरपालिका, अन्न व औषध प्रशासन विभाग व जिल्हा प्रशासनाचे लक्ष नाही. या दुकानांमध्ये जाऊन खाद्य पदार्थांच्या दर्जाची तपासणी करण्याचे सौजन्यही संबंधित विभागाकडून दाखविले जात नाही.