वरोरा : नोंदणीकृत वैद्यकीय सेवेत काम करणाऱ्या एका संस्थेने शहरातील एका खासगी वैद्यकीय डॉक्टरच्या संमतीने त्यांच्या नावाने पत्रके तयार केले. खासगी रुग्णालयातून औषधी विक्री करणे सुरू केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. हा प्रकार नियमबाहय असला तरी, तक्रार करण्यात कुणीही समोर येत नसल्याने नोंदणीकृत संस्था व खासगी वैद्यकीय अधिकाऱ्याचे फावत आहे. हा प्रकार वरोरा शहरासह अनेक ठिकाणी सुरू असल्याचे दिसून येत आहे. वैद्यकीय क्षेत्राम काम करावयाचे असल्याने अनेकांनी आपल्या संस्था नोंदणीकृत करुन घेतल्या. आता या संस्थानी वैद्यकीय क्षेत्रात नवा फंडा आणत पैसे कमविण्याचा नवीन मार्ग अवलंबिला आहे. एखाद्या गावातील खासगी वैद्यकीय अधिकाऱ्यास गाठायचे. त्यांचा त्या औषधाची व कंपनीची माहिती सांगत एका औषधावर कमिशन देण्याचे प्रलोभत दाखवित असल्याचे समजते. त्या वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून प्रमाणपत्र मिळवायचे. त्यानंतर खासगी वैद्यकीय अधिकाऱ्याचे नाव रुग्णालयाचे नाव टाकून पत्रक तयार करायचे बेरोजगारांना घरोघरी पाठवून १० रुपये नोंदणी शुल्क घेवून ते पत्रक घरी द्यायचे. त्यानंतर पत्रक घेऊन येणाऱ्या व्यक्तीस ती औषधी खासगी रुग्णालयातून शंभर रुपये घेवून विकायची. औषधी विकताना नोंदणीकृत संस्था एक छापील पावतीही देत आहे. असाच एक प्रकार एकाच आडनावाचे असलेल्या खासगी वैद्यकीय अधिकाऱ्यासोबतच घडला. सदर औषधी घेतल्यास त्याचे मोठ्या प्रमाणात फायदे होत असल्याचे त्या पत्रकात नमूद करण्यात आले आहे. जेव्हा औषधी घेताना अधिकृत वैद्यकीय अधिकाऱ्याचे पत्र तसेच शासनाने नेमून दिलेल्या ठिकाणाहून औषधी विकत घेतली जात असते. असे असताना हा प्रकार सर्रासपणे सुरू असल्याने वैद्यकीय क्षेत्रातही आश्चर्य व्यक्त केले जात आहे. सदर औषधी २५ रुपयाची असल्याने १०० रुपयात विकली जात असल्याचे समजते. याबाबत अन्न व औषधी निरीक्षक मनिष गोतमारे यांच्याशी संपर्क साधला असता त्या- त्या औषधी लेबल व इंडिकेशन बघावे लागेल. त्यानंतरच पुढील दिशा ठरवावी, लागेल अशी माहिती दिली. (तालुका प्रतिनिधी)
खासगी रुग्णालयातून औषधांची विक्री
By admin | Updated: September 3, 2014 23:16 IST