शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
2
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
3
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
4
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
5
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
6
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
7
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
8
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
9
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
10
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
11
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
12
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
13
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
14
कोलकाताच्या तोंडातून विजयी घास हिसकावला; मुकुल चौधरीची फलंदाजी पाहून ऋषभ पंत गेला भारावून!
15
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
16
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
17
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
18
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
19
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
20
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
Daily Top 2Weekly Top 5

साई आयटीआयची आज कार्यालयीन चौकशी

By admin | Updated: March 7, 2017 00:35 IST

येथील साई आयटीआय परीक्षा केंद्रावर गैरप्रकार होत असून, सामूहिक कॉपीला प्रोत्साहन दिले जात असल्याने ...

तीन सदस्यीय समिती : व्यवसाय व शिक्षण संचालनालयाचे पथकचंद्रपूर : येथील साई आयटीआय परीक्षा केंद्रावर गैरप्रकार होत असून, सामूहिक कॉपीला प्रोत्साहन दिले जात असल्याने अनेक विद्यार्थ्यांवर अन्याय होत असल्याचा आरोप ताराशक्ती आयटीआयच्या विद्यार्थ्यांनी काही दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेऊन केला होता. याप्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशीचे आदेश दिल्याने समिती गठित करण्यात आली होती. या समितीच्या चौकशीतही गैरप्रकार आढळून आल्याने व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाने तीन सदस्यीय समिती गठित केली आहे. ही समिती मंगळवारी साई आयटीआयच्या कार्यालयीन चौकशीसाठी चंद्रपुरात दाखल होत आहे.विद्यार्थ्यांनी गैरप्रकार होत असल्याची तक्रार जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक आणि शासकीय आयटीआयचे प्राचार्य नितीन जुनोनकर यांच्याकडे केली होती. साई आयटीआय येथे आयटीआयच्या परीक्षेचे केंद्र देण्यात आले आहे. ताराशक्ती आयटीआयचे परीक्षा केंद्रसुद्धा येथेच देण्यात आले आहे. विद्यार्थ्यांनी पत्रकार परिषद घेऊन २३ फेब्रुवारीला झालेला पेपर तब्बल दोन तास उशिराने देण्यात आला. शिवाय विद्यार्थ्यांकडे पैशाची मागणी करण्यात आली. ज्या विद्यार्थ्यांनी पैसे दिले, त्यांची व्यवस्था स्वतंत्र खोलीत करण्यात आली. तर ज्यांनी पैसे दिले नाही, त्यांची व्यवस्था इतरत्र करण्यात आली, असा आरोप केला होता. पैसे न देणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षेदरम्यान पाण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली नव्हती. त्यांना लघुशंकेसाठी बाहेरही जाऊ दिले नाही, असा आरोपही विद्यार्थ्यांनी केला होता. शिवाय परीक्षा केंद्र बदलवून देण्याची मागणी विद्यार्थ्यांनी केली होती.या प्रकरणाची गंभीर दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशीचे आदेश दिले. समितीने चौकशी केली. समितीने सादर केलेल्या अहवालातही गैरप्रकार होत असल्याचे नमूद असल्याने व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाने तीन सदस्यीय समिती गठित करून चौकशीसाठी पाठविण्याचा निर्णय घेतला आहे.ही समिती मंगळवारी चंद्रपुरात दाखल होवून साई आयटीआयची कार्यालयीन चौकशी करणार आहे. (स्थानिक प्रतिनिधी) प्राचार्य व केंद्रप्रमुखावर टांगती तलवारसाई आयटीआयच्या चौकशीसाठी व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाने तीन सदस्यीय समिती गठित केली आहे. या समितीत भंडारा येथील व्यवसाय प्रशिक्षण अधिकारी, बल्लारपूर येथील आयटीआयचे प्राचार्य व आयटीआयच्या नागपूर प्रादेशिक मुख्यालयातील एका अधिकाऱ्याचा समावेश आहे. तिनही सदस्य साई आयटीआयची मंगळवारी कार्यालयीन चौकशी करणार आहेत. गैरप्रकार आढळल्यास आयटीआयचे प्राचार्य पेशट्टीवार व केंद्रप्रमुख रासेकर यांच्यावर कारवाईची टांगती तलवार आहे.