शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
2
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
3
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
4
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
5
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
6
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
7
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
8
अमरनाथ यात्रा ३ जुलैला सुरू होणार; १५ एप्रिलपासून नोंदणी
9
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
10
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
11
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
12
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
13
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
14
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
15
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
16
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
17
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
18
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
19
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
20
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

जलयुक्त शिवारमुळे सागरा झाले सागर !

By admin | Updated: July 8, 2015 01:15 IST

कोरडवाहू क्षेत्र असलेल्या भद्रावती तालुक्यातील सागरा गावात कृषी विभागाने राबविलेल्या जलयुक्त शिवार अभियानामुळे मोठ्या प्रमाणात पाण्याचा स्त्रोत उपलब्ध झाला आहे.

३२५ एकर क्षेत्र संरक्षित ओलीत : ६ जुन्या सिमेंट बांधांमध्ये ३६ टीएमसी पाणीचंद्रपूर : कोरडवाहू क्षेत्र असलेल्या भद्रावती तालुक्यातील सागरा गावात कृषी विभागाने राबविलेल्या जलयुक्त शिवार अभियानामुळे मोठ्या प्रमाणात पाण्याचा स्त्रोत उपलब्ध झाला आहे. सह जुन्या सिमेंट बांध खोलीकरणामुळे शिवारातील शेतीला शाश्वत सिंचनासाठी मुबलक पाणी उपलब्ध झाले आहे. जुन्या सिमेंट बांधामध्ये ३६ टीएमसी पाणी साठा असून ३२५ एकर क्षेत्रावर संरक्षीत ओलीत होणार आहे. पावसाच्या दडीमुळे पिकांना आवश्यक असलेले पाणी या बांधामधून प्राप्त होणार असल्याने परिसरातील शेतकऱ्यांची चिंता सध्या तरी मिटली आहे.सागरा हे गाव जलयुक्त शिवार अभियानात समाविष्ट असून विदर्भ सघन सिंचन विकास कार्यक्रमातही या गावचा समावेश आहे. विदर्भ सघन सिंचन विकास कार्यक्रमातंर्गत सागरा परिसरात ६४ शेततळे घेण्यात आली आहेत. हे शेततळे सद्या काठोकाठ भरली असून शेततळ्यात ७६ टीएमसी पाणीसाठा आहे. यावर्षी जलयुक्त शिवार मध्ये ६ जुने सिमेंट बांध खोलीकरण करण्यात आले असून या बांधामध्ये मुबलक पाणी साठल्याने पाण्याचा उपयोग सिंचनासाठी होणार आहे.सागरा हे गाव कोरडवाहू क्षेत्रात येत असल्यामुळे या ठिकाणी सिंचनाच्या सोई अपुऱ्या होत्या. त्यामुळे शेतकऱ्यांना केवळ पावसाच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागत होते. कृषी विभागाच्या वतीने राबविण्यात बांधण्यात आलेल्या ६४ शेततळ्यांमुळे सिंचनाची सोय उपलब्ध झाली. (स्थानिक प्रतिनिधी)