शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
3
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
4
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
5
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
6
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
7
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
8
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
9
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
10
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
11
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
12
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
13
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
14
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
15
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
16
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
17
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
18
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
19
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
20
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ शासन निर्णयात बदल करावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2021 04:25 IST

चंद्रपूर : सामान्य प्रशासन विभागाने १८ फेब्रुवारी २०२१ रोजी निर्गमित केलेल्या शासन निर्णयाने मागासवर्गीय अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष व ...

चंद्रपूर : सामान्य प्रशासन विभागाने १८ फेब्रुवारी २०२१ रोजी निर्गमित केलेल्या शासन निर्णयाने मागासवर्गीय अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष व संभ्रम निर्माण झाला आहे. त्यामुळे त्या शासन निर्णयात दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी बहुजन एम्प्लाॅईज फेडरेशनने केली आहे.

मागासवर्गीयांना सामाजिक न्याय मिळण्याच्या अनुषंगाने आरक्षण कायद्यानुसार २००४ च्या शासन निर्णयानुसार अ.जा, अ. ज, विमुक्त जाती, भटक्या जमाती, विशेष मागास, इतर मागास आदी प्रवर्गासाठी पदोन्नतीच्या पदाकरिता ३३ टक्के आरक्षण मंजूर केले होते. मात्र २०१७ रोजी हा शासन निर्णय रद्द करण्यात आला. परंतु, ज्या कायद्याने आरक्षण दिले आहो. तो कायदा आजही कायम आहे. दरम्यान सामान्य प्रशासन विभागाच्या २९ डिसेंबर २०१७ च्या पत्रानुसार मागासवर्गीय अधिकाऱ्यांच्या यापूर्वी पदोन्नती आरक्षणाचा लाभ घेतला असेल अशा कर्मचारी अधिकारी यांना मागील ४ वर्षांपासून आजतगायत थांबविण्यात आले होते. यासाठी महाविकास आघाडी सरकारने मागासवर्गीय पदोन्नती संदर्भातील प्रलंबीत प्रश्नाकरिता निर्णय घेण्यासाठी नामदार अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिगटाची स्थापना केली. परंतु, मंत्रीगटाच्या शिफारशी विचारात न घेता सामान्य प्रशासन विभागाच्या १८ फेब्रुवारी २०२१ च्या शासन निर्णयात २५ मे २००४ रोजीच्या सेवाज्येष्ठतेनुसार पदोन्नतीच्या कोट्यातील सर्व पदे कुठल्याही आरक्षणाचा विचार न करता दिल्या जाईल असे नमूद करण्यात आले आहे. यामुळे मागासवर्गीयांसाठी आरक्षीत असलेल्या जागा यापुढे उपलब्ध राहणार नाही. त्यामुळे मागासवर्गीय अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. त्यामुळे शासन निर्णयात तातडीने बदल करावा, अन्यथा घटनात्मक संघर्ष उभा करण्यात येईल, असा इशारा संघटनेचे राज्य अध्यक्ष राजकुमार जवादे, प्रमुख सल्लागार सुभाष मेश्राम, विजय सिडाम, पुरुषोत्तम आवळे, सुरेश शंभरकर, बानईचे, निरज नगराळे, एस. एच. सहारे आदींनी दिला आहे.