शहरं
Join us  
Trending Stories
1
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
2
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
3
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
4
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
5
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
6
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
7
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
8
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
9
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
10
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
11
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
12
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
13
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
14
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
15
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
16
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
17
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
18
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
19
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
20
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

शाळा व्यवस्थापन समितीशी मुख्याध्यापकाचे असभ्य वर्तन

By admin | Updated: July 12, 2014 01:02 IST

राजोली येथील जि.प. शाळेचे मुख्याध्यापक तेथील शाळा व्यवस्थापन समितीशी बेजबाबदारपणाचे वर्तन करीत असून त्यांच्या मनमानी कारभाराची..

नागभीड : राजोली येथील जि.प. शाळेचे मुख्याध्यापक तेथील शाळा व्यवस्थापन समितीशी बेजबाबदारपणाचे वर्तन करीत असून त्यांच्या मनमानी कारभाराची व शालेय पोषण आहाराची चौकशी करावी, अशी मागणी गटशिक्षणाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे.राजोली (बोंड) येथे चौथ्या वर्गापर्यंत शिक्षणाची सोय असून बी.जी. खोब्रागडे हे मुख्याध्यापक म्हणून कार्यरत आहेत. नवीन सत्राची सुरूवात होऊन १० ते १२ दिवसांचा कालावधी होत असला तरी या शाळेत अद्यापही माध्यान्ह भोजन योजना सुरू करण्यात आली नाही. शाळा व्यवस्थापन समितीच्या एखाद्या सदस्याने व्यवस्थापन समितीची बैठक घ्या, अशी मागणी केली तर उर्मटपणे उत्तर देवून सभा घेण्यास नेहमीच टाळाटाळ करतात, असा आरोप आहे.शालेय पोषण आहारासंदर्भात शासनाने एक परिपत्रक जारी केले आहे. मुख्याध्यापकाने या परिपत्रकाप्रमाणे नोटीस काढायला पाहीजे होती. पण मात्र नोटीस काढलीच नाही. यासंदर्भात विचारणा केली असता बचत गटांना काम देण्यासंदर्भात तारखेचा उल्लेख नसलेली नोटीस लावण्यात आली आणि त्यावरील ३० जूनला नोटीस काढून २ जुलैपर्यंत अर्ज करण्याची मर्यादा घालून देण्यात आली आणि आपल्या निष्काळजीपणाचा परिचय मुख्याध्यापकांनी दिला. (तालुका प्रतिनिधी)