शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
4
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
5
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
6
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
7
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
8
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
9
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
10
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
11
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
12
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
13
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
14
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
15
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
16
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
17
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
18
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
19
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
20
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
Daily Top 2Weekly Top 5

आरटीओ कार्यालय झाले ‘आॅनलाईन’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2017 00:55 IST

उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात वाहन परवाना काढणे, परवान्याचे नुतनीकरण करणे, पत्त्यात बदल करणे ....

पहिल्या शिकाऊ परवान्याचे वितरण : सारथी ४.० प्रणालीचा वापरचंद्रपूर : उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात वाहन परवाना काढणे, परवान्याचे नुतनीकरण करणे, पत्त्यात बदल करणे अशी विविध कामे आता आॅनलाईन करण्यासाठी सारथी ४.० हे नवीन व्हर्जन मंगळवारपासून चंद्रपुरातील उपप्रादेशिक कार्यालयात कार्यान्वीत करण्यात आले आहे. त्यानुसार पहिल्या शिकाऊ परवान्याचे वितरण मंगळवारी दुपारी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विनय अहिरे यांच्या हस्ते करण्यात आले. सर्व प्रक्रिया आॅनलाईन झाली असल्याने परवान्यासाठी कार्यालयात चकरा मारणे आता बंद होणार आहे. सर्व उपप्रादेशिक कार्यालयात सारथी ४.० चा वापर करुन आॅनलाईन कामे करण्याच्या सुचना देण्यात आल्या. त्यानुसार परिवहन डाट जीओवी डाट इन हे संकेतस्थळ उपलब्ध करुन देण्यात आले आहे. यामध्ये सर्व आरटीओ व उपप्रादेशिक कार्यालय एकमेंकाना जोडण्यात आले आहे. यावर शिकाऊ परवाने, कायमस्वरुपी परवाने, व्यावसायिक परवाने, टॅक्स, मोठ्या वाहनाचे परवाने, ॅफॅन्सी नंबर आदींची माहिती उपलब्ध राहणार आहे. त्यामध्ये शिकाऊ परवाना व परमानंट परवाना बाबत अपार्इंटमेंटची सोयही उपलब्ध करुन देण्यात आली आहे. सोबतच आवश्यक कागदपत्र स्कॅन करुन अर्जासोबत डाऊनलोड करता येणार आहेत. तसेच उमेदवाराने जर त्यामध्ये आपला मोबाईल नंबर व ईमेल आयडी टाकला तर त्यांना स्टेटससुद्धा कळणार आहे. चंद्रपुरातील उपप्रादेशिक परिवहन कार्यालय मंगळवारला पहिल्या शिकाऊ परवान्याचे वितरण उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विनय अहिरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मोटार वाहन निरिक्षक तुकाराम सपकाळ, सहायक निरिक्षक संजय आळे, प्रणाली प्रशासक, सुलभा चव्हाण, सुनिल बागेसर आदी उपस्थित होते. (नगर प्रतिनिधी)दलालांपासून होणार मुक्तीआरटीओ कार्यालयात परवाना काढण्यासाठी गेलेल्या नागरिकांना दलाल गाठून त्यांच्याकडून शिकाऊ परवाना काढण्यासाठी ५०० ते ६०० रुपये तर परमानंट परवाना काढण्यासाठी एक हजार रुपयांच्या जवळपास दलाल घेत होते. मात्र आता आॅनलाईन पद्धती आल्याने नागरिकांचे काम घरबल्या होणार आहे. त्यामुळे नागरिकांची दलालापासून होणारी लूट थांबणार आहे. सारथी ४.० ही विकसीत यंत्रणा मंगळवारपासून कार्यान्वीत करण्यात आली आहे. ही प्रक्रिया सोपी असल्याने अर्ज करणाऱ्यांचे काम सोपे झाले आहे. काही दिवसांत ही प्रक्रिया कॅशलेस होणार आहे. सारथी ४.० व अर्जदार आपले सर्व कामे घरबसल्या करु शकणार आहेत. त्यामुळे अर्जदारांना ही प्रक्रिया सोईस्कर ठरणार आहे. तर वाहनाच्या नोंदणीसाठीही नवी आॅनलॉईन प्रक्रिया लवकरच सुरु करण्यात येणार आहे. - विनय अहिरे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, चंद्रपूर.