शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीपूर्वीच एनडीएत बंडखोरी! चिराग पासवान यांची घोषणा, सर्व २४३ जागांवर लढणार...
2
“प्रश्न निवडणूक आयोगाला विचारले, पण उत्तर भाजपाने दिले, म्हणजे मॅच फिक्सिंगवर शिकामोर्तबच”
3
Monsoon Update : मान्सूनच्या पावसाला कधीपासून सुरुवात होणार? हवामान विभागाने दिली अपडेट
4
फिल्मी दुनियेत शिल्पा नावाने प्रसिद्ध, पण खरं नाव दुसरंच, 'या' गोष्टीची तिला आजही वाटते भीती!
5
पाकिस्तानने पुन्हा हात पसरले! अमेरिकेकडून एअर डिफेन्स सिस्टम मागितली
6
धक्कादायक! जो समोर आला, त्याच्याशी संसार थाटला; ३ वर्षांत २० वेळा लग्न केलं अन्...
7
Rinku Singh अन् Priya Saroj यांच्या साखरपुड्यातील थाट; त्या महागड्या हॉटेलात सर्वात स्वस्त थाळी हजारात
8
धार्मिक भावना दुखावत असतील तर मांसाहारी हॉटेलमध्ये का जाता? ग्राहक आयोगाने मुंबईतील तक्रार फेटाळली 
9
“राहुल गांधी यांच्या प्रश्नांना निवडणूक आयोग वस्तुनिष्ठ उत्तर का देत नाही?”: हर्षवर्धन सपकाळ
10
पुतिन आर्मीने आणखी एका शहरावर फडकावला झेंडा; युक्रेनच्या 20 टक्के भूमिवर मिळवला ताबा
11
टोल मागितल्यावर कर्मचाऱ्याच्या अंगावर घातली गाडी, फरफटत नेत काढला पळला; चंद्रपुरातील घटना
12
Raja Raghuvanshi : सोनम-राजाचा पाठलाग करत होती 'लाल' कार? नव्या CCTV फुटेजमध्ये दिसली संशयास्पद हालचाल
13
“एकनाथ शिंदेंना नकोत, आदित्य-उद्धव ठाकरेंना त्रास दिला, एकनिष्ठ व्यक्ती हवी”: चंद्रकांत खैरे
14
"पैसा वळवलेला नाही, बजेटनुसारच तो खर्च केलाय"; लाडकी बहीणवरुन CM फडणवीसांचे स्पष्टीकरण
15
Priya Saroj Rinku Singh: रिंकूने अंगठी घालताच प्रिया सरोज यांना अश्रू अनावर; बघा साखरपुड्यातील व्हिडीओ
16
राजा रघुवंशीची हत्या, सोनम अजूनही बेपत्ता; मेघालयात हनिमूनसाठी गेलेल्या जोडप्यासोबत नेमकं काय घडलं?
17
LIC ने महिलांसाठी आणली खास योजना, दरमहा मिळतील ७००० रुपये; जाणून घ्या माहिती...
18
क्रिकेटर रिंकू सिंह आणि खासदार प्रिया सरोज यांचा साखरपुडा! दोघांच्या खास लूकची चर्चा; इथं पाहा Pics
19
पुण्यात अंधश्रद्धेचा कळस! झाडातून वाहू लागलं पाणी, लोकांनी पूजा करत घेतले दर्शन; नंतर कळलं की...
20
चाकू लागला तरी रिक्षाची चावी काढून पळाला अन्... परीक्षेसाठी आलेल्या तरुणाची पैशाच्या वादातून हत्या

छत कोसळले

By admin | Updated: June 26, 2014 23:11 IST

अहेरी तालुक्यातील पेरमिली परिसरातील चौडमपल्ली या गावातील अंगणवाडी केंद्राच्या इमारतीचे छत पावसाने मंगळवारी रात्रोच्या सुमारास कोसळले. मात्र दिवसाची घटना नसल्याने जीवितहानी टळली.

जीवितहानी टळली : चौडमपल्ली येथील अंगणवाडीचेपेरमिली : अहेरी तालुक्यातील पेरमिली परिसरातील चौडमपल्ली या गावातील अंगणवाडी केंद्राच्या इमारतीचे छत पावसाने मंगळवारी रात्रोच्या सुमारास कोसळले. मात्र दिवसाची घटना नसल्याने जीवितहानी टळली.पेरमिली परिक्षेत्रांतर्गत चौडमपल्ली, आरेव्हा, कातमपल्ली, मुडझा व कोरेली या गावातील अंगणवाडी केंद्राच्या इमारती जिर्णावस्थेत आहेत. मात्र याकडे प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे. बाल विकास प्रकल्प अधिकाऱ्यांकडे तोंडी तक्रार करूनही दखल घेण्यात आली नाही. जीर्णावस्थेत असलेल्या अंगणवाडी केंद्राच्या इमारतीची माहिती आरोग्य सेविकांनी बालविकास विभागाला दिली. मात्र संबंधित विभागाने याकडे पूर्णत: दुर्लक्ष केले. आता पावसाळ्याचे दिवस सुरू झाले आहे. गेल्या दोन-तीन दिवसापासून जिल्हाभरात पाऊस सुरू आहे. यामुळे जीर्ण इमारती कोसळण्याची दाट शक्यता असते. यामुळे प्रशासनाने नियोजन करून पावसाळ्यापूर्वीच जीर्ण अंगणवाडी केंद्राच्या इमारती दुरूस्त करायला पाहिजेत, अशी मागणी होत होती. चौडमपल्ली येथे बुधवारी सकाळी अंगणवाडी केंद्र उघडण्यात आले असता, स्लॅबचे छत पडल्याचे दिसून आले. सरपंच व गावकऱ्यांनी या घटनेची पाहणी केली. या अंगणवाडी केंद्रातील सामान एका व्यक्तीच्या घरी हलवून तेथे अंगणवाडी भरविण्यात आली. गावकऱ्यांनी प्रशासनावर रोष व्यक्त केला आहे. सदर घटना दिवसा घडली असती तर यामध्ये एखादा बालक सापडला असता, मात्र सुदैवाने जीवितहानी झाली नाही.