शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
2
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
3
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
4
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
7
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
8
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
9
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
10
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
11
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
12
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
13
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
14
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
15
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
16
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
17
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
18
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
19
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
20
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
Daily Top 2Weekly Top 5

रस्ते रुंदावणार, जलवाहिन्या बदलणार

By admin | Updated: August 20, 2014 23:25 IST

चंद्रपुरातील अरुंद रस्त्यांचे रुंदीकरण व खिळखिळ्या झालेल्या जलवाहिन्या बदलविण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय आज बुधवारी झालेल्या महापालिकेच्या आमसभेत घेण्यात आला. याला सभागृहाने मंजुरीही दिली.

भाजीपाला विक्री केंद्र : मनपाच्या आमसभेत मंजुरीचंद्रपूर : चंद्रपुरातील अरुंद रस्त्यांचे रुंदीकरण व खिळखिळ्या झालेल्या जलवाहिन्या बदलविण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय आज बुधवारी झालेल्या महापालिकेच्या आमसभेत घेण्यात आला. याला सभागृहाने मंजुरीही दिली.महानगरपालिकेची आमसभा आज मनपाच्या सातमजली इमारतीच्या सभागृहात आयोजित करण्यात आली होती. या सभेसाठी अजेंड्यात ठेवण्यात आलेल्या सर्व विषयांना कोणताही वादविवाद न होता मंजुरी मिळाली, हे विशेष. चंद्रपूर शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढली आहे. वाहनांची संख्याही वाढली आहे. मात्र ३० वर्षांपूर्वीचे रस्ते आजही तसेच कायम आहे. त्यामुळे शहरात नेहमीच वाहतूक व्यवस्थेचे बारा वाजताना दिसतात. शहर विकास आराखड्यानुसार एकाही रस्त्याचे रुंदीकरण महापालिकेला आजवर करता आले नाही. त्यामुळे आता या रस्त्याच्या रुंदीकरणाबाबत आमसभेत जोरदार चर्चा करण्यात आली. शहरातील प्रमुख रस्त्यांवर अतिक्रमण झाले आहे. ते अतिक्रमण काढून व गरज आहे तिथे भूसंपादन करून रस्ते रुंदीकरण करण्याच्या प्रस्तावाला सभागृहाने मंजुरी दिली. याशिवाय पाणी पुरवठा करणाऱ्या जलवाहिन्यांचाही प्रश्न बिकट आहे. जुन्या जलवाहिन्या आता खिळखिळ्या झाल्या आहे. या जलवाहिन्या बदलवून नवीन जलवाहिन्या टाकण्यालाही आमसभेत सर्व नगरसेवकांनी मंजुरी दिली. त्यामुळे आता चंद्रपूरकरांना शुध्द पाण्याचा पुरवठा होऊ शकणार आहे.१० वर्षांपूर्वी केलेल्या सर्वेक्षणानुसार महापालिका मालमत्ता कर आकारणी करीत आहे. मागील १० वर्षांत अनेक नवीन इमारती बांधण्यात आल्या आहेत. याशिवाय अनेक निवासी इमारतींचे व्यावसायिकीकरण झाले आहे. यात महापालिकेला मोठा आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. त्यामुळे आता शहरातील प्रापर्टीचे नव्याने सर्व्हेक्षण करण्यात येणार आहे. वेकोलिच्या दुर्गापूर, भटळी कोळसा खाणीतील ब्लॉस्टिंगमुळे तूकूम परिसरात जलशुध्दीकरणाची पाईप लाईन वेळोवेळी फुटते. त्यामुळे आता वेकोलिच्या खनिज विकास निधीतून या पाईपलाईनमध्ये सुधारणा करण्याचा निर्णयही आजच्या आमसभेत घेण्यात आला.शेतकऱ्यांसाठी यंदा प्रथमच महापालिकेने सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. जे शेतकरी आपल्या शेतामध्ये भाजीपाला, कडधान्यांची लागवड करतात. त्यांना आपला शेतमाल दलालाशिवाय थेट विकता यावा, यासाठी भाजीपाला विक्री केंद्र उपलब्ध करून देण्यात येणार आहे. शहरातील प्रत्येक झोनमध्ये हे केंद्र असणार आहे. तिथे शेतकऱ्यांना आपला शेतमाल थेट ग्राहकांना विकता येणार आहे. याला आमसभेने मंजुरी दिली आहे. (शहर प्रतिनिधी)