शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
2
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
3
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
4
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
5
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
6
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
7
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
8
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
9
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
10
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
11
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
12
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
13
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
14
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
15
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
16
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
17
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
18
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
19
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
20
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
Daily Top 2Weekly Top 5

८० वर्षांवरील ४९ हजारांवर मतदार बजावणार मतदानाचा हक्क

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2019 22:21 IST

लोकसभा निवडणूक अगदी काही दिवसांवर आली असून सर्वच मतदारांमध्ये उत्साह शिगेला पोहचला आहे. असे असले तरी चंद्रपूर लोकसभा क्षेत्रातील ८० वर्षांपेक्षा जास्त वय असलेले ४९ हजार ४५७ उमेदवार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहे. विशेष म्हणजे, सर्वांत जास्त वयोवृद्ध मतदारांची संख्या आर्णी विधानसभा क्षेत्रात असून बल्लारपूर विधानसभा क्षेत्रात सर्वात कमी वयोवृद्ध मतदारांची संख्या आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : लोकसभा निवडणूक अगदी काही दिवसांवर आली असून सर्वच मतदारांमध्ये उत्साह शिगेला पोहचला आहे. असे असले तरी चंद्रपूर लोकसभा क्षेत्रातील ८० वर्षांपेक्षा जास्त वय असलेले ४९ हजार ४५७ उमेदवार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहे. विशेष म्हणजे, सर्वांत जास्त वयोवृद्ध मतदारांची संख्या आर्णी विधानसभा क्षेत्रात असून बल्लारपूर विधानसभा क्षेत्रात सर्वात कमी वयोवृद्ध मतदारांची संख्या आहे.लोकसभेसाठी ११ एप्रिल रोजी मतदान घेण्यात येणार आहे. प्रशासनाने तयारी केली असून इव्हीएमची बटन दाबून मतदान करता येणार आहे. चंद्रपूर लोकसभा मतदार क्षेत्रात सहा विधानसभा क्षेत्र आहे. यामध्ये राजुरा, चंद्रपूर, बल्लारपूर, वरोरा, वणी, आर्णी विधानसभा क्षेत्राचा समावेश आहे.निवडणूक म्हटली की, शहरापासून तर ग्रामीण भागात चर्चेचा विषय असतो. जो-तो आपआपल्या पार्टीचा प्रचार करतो. सध्या कार्यकर्ते प्रचारात गुंतलेले असून मतदानाची गावनिहाय गोळाबेरीच करण्यामध्ये व्यस्त आहे. यामध्ये समाज, धर्मनिहायही बेरीज केल्या जात आहेत.यामध्ये कोणता उमेदवार बाजी मारेल हे २३ मे नंतरच सांगता येणार आहे. यावर्षी १८ ते १९ वयोगटातील २२ हजार ९६५ मतदार प्रथमच आपला मतदानाचा हक्क बजावणार आहे. तर ४९ हजार ४५७ मतदार हे ८० वर्षांपेक्षा जास्त वर्षांचे असून ते त्याच उत्साहात आपला मतदानाचा हक्क बजावणार आहे. बल्लारपूर विधानसभा क्षेत्रामध्ये ८० वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या मतदारांची संख्या ६ हजार ८९६ असून ही चंद्रपूर लोकसभा मतदार संघातील सर्वात कमी संख्या आहे. तर सर्वात जास्त वयोवृद्ध मतदारांची संख्या आर्णी मतदार संघात असून ती १० हजार १४५ इतकी आहे. राजुरा विधानसभा क्षेत्रामध्ये ८० वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या मतदारांची संख्या ७ हजार २७ आहे. चंद्रपूरमध्ये ८ हजार ६४८, वरोरा ८ हजार ३७४, वणी- ८ हजार ३६७ वयोवृद्ध मतदारांची संख्या आहेत.