शहरं
Join us  
Trending Stories
1
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
2
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
3
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
4
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
5
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
6
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
7
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
8
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
11
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
12
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
13
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
14
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
15
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
16
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
17
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
18
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
19
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)
20
अमेरिकेचा डबल गेम! आधी इराणवर हल्ला, निर्बंध लादले; आता करणार ३० बिलियन डॉलर्सची मदत

ब्रिटिशकालीन मालगुजारी तलावाचे पुनरुज्जीवित

By admin | Updated: July 25, 2015 01:14 IST

ब्रह्मपुरी पंचायत समिती अंतर्गत महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेअंतर्गत विविध प्रकारची कामे उपलब्ध करुन ...

ब्रिटिशकालीन मालगुजारी तलावाचे पुनरुज्जीवित गांगलवाडी: ब्रह्मपुरी पंचायत समिती अंतर्गत महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेअंतर्गत विविध प्रकारची कामे उपलब्ध करुन मजुरांना मागील चार वर्षापासून रोजगार देण्यात येत आहे. बुधेवाडा येथे ब्रिटीशकालीन माजी मालगुजारी तलाव मागील २० वर्षापासून दुर्लक्षित होते. त्यालाही पुनरुजिवित करणे सुरू झाले आहे.या तलावाची पाळ जुन्या काळात गोट्यांनी बांधलेली असल्यामुळे जीर्ण होऊन वाहून गेली होती. त्यामुळे शेतकऱ्यांना सिंचनासाठी अडचण जात होती. तळोधी खुर्दचे सरपंच प्रमोद मोटघरे व संवर्ग विकास अधिकारी तोडावार यांनी प्रयत्न करुन सदर तलावाचे खोलीकरण व दुरुस्तीचे काम पूर्ण केले. तसेच सदर तलावास दोन तुडूंब व नवीन सलांग व तलावाच्या पाळीचे मातीकाम महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेतून पूर्ण करण्यात आले. शुन्य सिंचनावर आलेला तलाव आता ४० हेक्टर सिंचन करु शकतो. तसेच या तलावापासून निघालेल्या सांडव्याचे रुपांतर समोर नाल्यात होऊन तो चार किमी अंतर गोगाव येथील मोठ्या नाल्याला मिळतो. सदर नाल्यावर पाच साखळी बंधाऱ्याचे बांधकाम प्रस्तावित करण्यात आले आहे. जेणेकरुन तलावातील जास्तीचे पाणी सांडव्यावरुन निघून या पाच बंधाऱ्यात साठविले जाऊ शकते व या पाण्यापासून १५० हेक्टर जमीन सिंचनाखाली येऊन शेतकऱ्यांना त्याचा लाभ होऊ शकतो. मात्र संबंधित अभियंत्यांची बदली झाल्याने यात अडचणी येत आहेत. शेतकऱ्यांसाठी महत्वाचा असलेल्या प्रकल्पाचे काम बंद पडण्याची भीती या भागातील सरपंचांनी व्यक्त केली आहे. यासाठी सदर अभियंत्यांची बदली रद्द करुन त्यांनी ब्रह्मपुरीलाच ठेवावे, अशी मागणी सरपंचांनी केली आहे. (वार्ताहर)