शहरं
Join us  
Trending Stories
1
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
2
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
3
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
4
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
7
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
8
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
9
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
10
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
11
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
12
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
13
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
14
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
15
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
16
IPL 2026: कोलकाताच्या तोंडातून विजयी घास हिसकावला; मुकुल चौधरीची फलंदाजी पाहून ऋषभ पंत गेला भारावून!
17
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
18
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
19
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
20
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
Daily Top 2Weekly Top 5

गडचांदूर येथे विविध शासकीय विभागांची आढावा बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2021 04:26 IST

कोरपना : गडचांदूर येथील नगर परिषदेच्या सभागृहात खासदार बाळू धानोरकर यांनी गुरुवारी आढावा बैठक घेतली. या बैठकीत कोरपना तालुक्यातील ...

कोरपना : गडचांदूर येथील नगर परिषदेच्या सभागृहात खासदार बाळू धानोरकर यांनी गुरुवारी आढावा बैठक घेतली.

या बैठकीत कोरपना तालुक्यातील नागरिकांच्या विविध समस्या तत्काळ मार्गी लावण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आल्या.

आरोग्य विभाग, विद्युत विभाग, महसूल विभाग व पोलीस प्रशासनाचे अधिकारी बैठकीला उपस्थित होते. सर्व अधिकाऱ्यांकडून त्यांच्या विभागाचा आढावा घेण्यात आला. उपस्थित नागरिकांनासुद्धा समस्या मांडण्याची संधी देण्यात आली. त्यानुसार नागरिकांच्या ज्या-ज्या समस्या आहे, त्या त्वरित सोडून अहवाल सादर करण्याच्या सूचना खासदार बाळू धानोरकर यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

जिल्हास्तरावर वेगवेगळ्या विभागाला ज्या प्रशासकीय अडचणी आहेत, त्यासुद्धा नोंदविण्यात आल्या. कोरोनाचे लसीकरण तत्काळ सुरू करण्याच्या सूचनासुद्धा यावेळी आरोग्य विभागाला देण्यात आल्या. शेतकऱ्यांना कृषिपंपासाठी देण्यात येणाऱ्या सुविधा व सवलती गावागावांत जाऊन शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्याच्या सूचना विद्युत विभागाला देण्यात आल्या. यावेळी राजुराचे नगराध्यक्ष अरुण धोटे, गडचांदूरच्या नगराध्यक्ष सविता टेकाम, तहसीलदार महेंद्र वाकलेकर, कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे, संवर्ग विकास अधिकारी बबनराव पाचपाटील, ठाणेदार गोपाल भारती नगर परिषदेचे उपाध्यक्ष शरद जोगी, मुख्याधिकारी विशाखा शेळकी, अरुण निमजे, विजय बावणे, सुरेश मालेकर, श्याम रणदिवे, पापय्या पोन्नमवार, विक्रम येरणे, आशिष देरकर, संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष उमेश राजूरकर उपस्थित होते.