शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
5
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
6
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
7
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
8
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
9
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
10
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
11
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
12
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
13
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
14
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
15
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
16
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
17
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
18
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
19
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
20
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

मूल तालुका हागणदारी मुक्तीचा संकल्प

By admin | Updated: April 16, 2016 00:38 IST

केंद्र शासनाने स्वच्छ भारत मिशन अभियान राबवून गाव हागणदारी मुक्त करण्याचा संकल्प चालविला आहे.

राज्यातील पहिला लोगो : संध्या गुरुनुले यांच्या हस्ते प्रकाशन मूल : केंद्र शासनाने स्वच्छ भारत मिशन अभियान राबवून गाव हागणदारी मुक्त करण्याचा संकल्प चालविला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहीर यांचे विशेष लक्ष असलेला मूल तालुका हागणदारी मुक्त व्हावा यासाठी पंचायत समिती मूलच्या अधिकाऱ्यांनी स्वतंत्र लोगो तयार करुन हागणदारी मुक्त चळवळीला गती देण्याचे कार्य केल्याने मत जिल्हा परिषद अध्यक्ष संध्या गुरुनुले यांनी व्यक्त केले. मूल पंचायत समिती कार्यालयात आयोजित लोगो प्रकाशन कार्यक्रमात त्या बोलत होत्या. पंचायत समिती मूलच्या वतीने ‘ग्राम उदय ते भारत उदय’ अभियान १४ ते २४ एप्रिलपर्यंत राबविण्यात येणार आहे. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १२५ वी जयंती निमित्त भारत सरकारच्या पंचायत राज मंत्रालयातर्फे सामाजिक सलोखा व अभिसरण वृद्धीगंत करणे, पंचायत राज संस्थांचे बळकटीकरण, शेतकऱ्यांचा विकास व गरीबांचे जीवनमान उंचावणे आदी कार्यक्रम येत्या १० दिवस गावागावात घेण्यात येणार आहेत.पंचायत समिती मूल येथे आयोजित ‘ग्राम उदय ते भारत उदय’ अभियानांची कार्यशाळा जि.प. अध्यक्ष संध्या गुरुनुले यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी पार पडली. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून प्रभारी संवर्ग विकास अधिकारी संजय पुरी, लोकमतचे तालुका प्रतिनिधी राजू गेडाम, कृषी अधिकारी विवेक दुधे, जि.प. पंचायत विभागाचे समाजशास्त्रज्ञ प्रकाश उमक, विस्तार अधिकारी जे.के. राऊत, राजू परसावार आदी उपस्थित होते. मूल तालुक्यातील ४९ ग्रामपंचायतीमधील शौचालयाचे उद्दीष्ट साध्य करण्यासाठी स्वतंत्र लोगोची निर्मिती करुन तालुका हागणदारी मुक्त करण्याचा संकल्प पंचायत समितीने केला आहे. (तालुका प्रतिनिधी)