शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
4
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
5
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
6
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
7
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
8
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
9
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
10
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
11
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
12
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
13
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
14
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
15
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
16
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
17
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
18
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
19
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
20
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
Daily Top 2Weekly Top 5

नव्या विभागात स्थलांतरणास विरोध

By admin | Updated: June 24, 2017 00:40 IST

शासनाने अलीकडेच मृद व जलसंधारण विभाग स्पापन केला. तसा आदेश मे महिन्यात निर्गमित करण्यात आला.

आधी आकृतीबंध तयार करा : कृषी विभागातील कर्मचाऱ्यांचे स्थलांतरलोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : शासनाने अलीकडेच मृद व जलसंधारण विभाग स्पापन केला. तसा आदेश मे महिन्यात निर्गमित करण्यात आला. या नव्या विभागात राज्य शासनाच्या कृषी विभागातील जवळपास १० हजार कर्मचाऱ्यांना वर्ग करण्याच्या हालचाली सुरू आहेत. त्याला या कर्मचाऱ्यांचा विरोध आहे. आधी आकृतिबंध तयार करा, नंतरच वर्ग करा, अशी भूमिका या कर्मचाऱ्यांनी स्वीकारली असल्याने शासनापुढे पेच निर्माण झाला आहे.मृद व जलसंधारण हा विभाग आधी कृषी विभागाच होता. मृद, जलसंधारणाची कामे मोठ्या प्रमाणावर होत असल्याच्या पार्श्वभूमीवर हा विभागच वेगळा करण्याची मागणी पुढे आली होती. या मागणीच्या अनुषंगाने मृद व जलसंधारण हा स्वतंत्र विभाग आता तयार करण्यात आला. ३१ मे २०१७ रोजी शासनाने तसा अध्यादेश निर्गमित केला. या अध्यादेशानंतर नव्या विभागात राज्य शासनाच्या कृषी विभागातील कर्मचाऱ्यांचा भरणा करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. मृद, जलसंधारण विभागाने कृषी सहायकास पदोन्नतीने मिळणाऱ्या पर्यवेक्षकांची सर्वच पदे आपल्याकडे घेण्याची तयारी सुरू केली आहे. त्यामुळे भविष्यात कृषी सहायकास पदोन्नतीला पद राहणार नाही. मुळातच कृषी विभागात बहुतांश पदे रिक्त आहेत. त्यातच ही पदे मृद व जलसंधारणात वर्ग केल्यानंतर उर्वरित कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण आणखी वाढण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.मोठ्या प्रमाणावर कर्मचारी वर्ग करण्याची प्रक्रिया सुरू झाली असल्याने कृषी विभागाचा सुधारित आकृतीबंध काय असेल, याबाबत या विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यात संभ्रमाचे वातावरण आहे. त्यामुळे आधी सुधारित आकृतीबंध तयार करावा, अशी मागणी महाराष्ट्र राज्य कृषी सहायक संघटनेने केली आहे. संघटनेने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, नवा आकृतीबंध तयार करताना संघटनेला विचारात घ्यावे. सुधारित आकृतीबंधात कृषी सहायकाचे पदनाम सहायक कृषी अधिकारी असे करावे. कृषी सहायकामधून कृषी पर्यवेक्षकांची पदे १०० टक्के पदोन्नतीने भरण्यात यावी. या प्रस्तावाला सामान्य प्रशासन विभाग, विधी व न्याय विभागाने यापूर्वीच मान्यता दिली आहे. पदोन्नती करताना परीक्षेची अट घालण्यात आली असून ही अट वगळण्याची मागणीही संघटनेची आहे.बदल्यांचे प्रस्ताव मंत्रालयात प्रलंबितराज्य शासनाच्या कृषी विभागातील कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे प्रस्ताव मागील दोन वर्षापासून मंत्रालयस्तरावर प्रलंबित आहेत. याबाबत संघटनेकडून वारंवार पाठपुरावा करण्यात आला. मात्र त्यावर अजूनही शासनाने निर्णय घेतला नसल्याने कृषी सहायकांमध्ये असंतोषाचे वातावरण पसरले आहे.