शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
4
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
5
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
6
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
7
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
8
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
9
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
10
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
11
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
12
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
13
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
14
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
15
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
16
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
17
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
18
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
19
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
20
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
Daily Top 2Weekly Top 5

मैदानी चाचणी ५० गुणांची केल्याने नाराजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2019 22:16 IST

गृह विभागाच्या नव्या आदेशाने पोलीस भरतीसाठी होणारी १०० गुणांची मैदानी चाचणी आता फक्त ५० गुणांची होणार आहे. त्यामुळे मागील अनेक वर्षांपासून मैदानी परीक्षेची तयारी करणाऱ्या युवकांमध्ये नाराजी पसरली आहे. तो निर्णय रद्द करावा, पूर्ववत नियमानुसार भरतीप्रकिया राबवावी, अशी मागणी होत आहे.

ठळक मुद्देपोलीस भरतीप्रक्रिया पूर्ववत राबवावी : बेरोजगार युवकांची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : गृह विभागाच्या नव्या आदेशाने पोलीस भरतीसाठी होणारी १०० गुणांची मैदानी चाचणी आता फक्त ५० गुणांची होणार आहे. त्यामुळे मागील अनेक वर्षांपासून मैदानी परीक्षेची तयारी करणाऱ्या युवकांमध्ये नाराजी पसरली आहे. तो निर्णय रद्द करावा, पूर्ववत नियमानुसार भरतीप्रकिया राबवावी, अशी मागणी होत आहे.पोलीस भरतीमध्ये सहभागी होणारे युवक-युवती शारीरिकदृष्ट्या सक्षम असावे, यासाठी पाच प्रकारच्या शारीरिक स्पर्धा घेण्यात येत होत्या. त्यानंतर १०० गुणांची लेखी परीक्षा, मुलाखत, कागदपत्र पडताळणी केल्यानंतर पोलिसात सहभागी होत असते. मात्र गृहविभागाने आता शारीरिक क्षमता केवळ ५० गुणांची केली असून काही चाचण्या कमी करण्यात आल्या आहे. तसेच शारीरिक क्षमता चाचणीपूर्वीच पेपर घेण्याचा निर्णय घेतला आहे.मात्र मागील अनेक वर्षांपासून बरेच युवक-युवती शारीरिक क्षमता चाचणीची तयारी करीत आहे. ज्या युवकांची शारीरिक क्षमता चाचणी योग्य आहे. अशा युवकांना या निर्णयाचा मोठा फटका बसणार आहे. त्यामुळे हा निर्णय रद्द करुन पूर्ववत भरतीप्रक्रिया राबवावी, अशी मागणी पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या युवकांकडून होत आहे.पोलीस भरतीची प्रतीक्षागृहविभागाने पोलीस भरतीसंदर्भात शासननिर्णय जाहीर केला. मात्र पोलीस भरती केव्हा राबविण्यात येणार आहे. याबाबत कोणत्याच प्रकारचा उल्लेख केला नाही. परिणामी पोलीस भरती केव्हा होणार, असा प्रश्न युवकांना सतावत आहे. मागील वर्षी शासनाने मोठ्या प्रमाणात पोलीस भरती राबविण्याची घोषणा केली होती. मात्र अद्यापही त्यांची अमंलबजावणी झाली नाही. त्यामुळे युवकांमध्ये नैराश्य पसरत आहे.शारीरिक क्षमतेकडे होणार दुर्लक्षपोलीस खात्यामध्ये शारीरिक व मानसिक तंदुरुस्तीची गरज असते. पोलिसांना काम करताना अनेक ताण-तणावातून सामोर जावे लागते, त्यामुळे शारीरिक सुदृढ व मानसिक आरोग्य सुदृढ असणे गरजेचे आहे. मात्र नव्या पद्धतीमुळे शारीरिक क्षमतेकडे दुर्लक्ष होणार आहे. त्यामुळे पोलीस खात्याचे आरोग्य आणि तंदुरुस्ती धोक्यात येणार आहे. म्हणून प्रथम शारीरिक चाचणी आणि नंतर लेखी परीक्षा घ्यावी अशी मागणी आहे.