शहरं
Join us  
Trending Stories
1
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
4
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
5
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
6
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
7
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
8
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
9
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
10
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
11
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
12
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
13
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
14
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
15
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
17
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
18
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
19
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
20
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
Daily Top 2Weekly Top 5

आरक्षणामुळे उजाडलेले प्रेमनगर पुन्हा वसले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2018 22:28 IST

तेलंगणा आणि आंध्रप्रदेशात बंजारा आणि आदिवासी समाजात आरक्षणावरून वाद पेटला होता. त्यावेळी जिवती तालुक्यातील तेलंगणा राज्याच्या सीमेवर असलेल्या प्रेमनगर गावातील आदिवासी नागरिकांना या आरक्षणाचा फायदा मिळेल, म्हणून तेलंगणा राज्यातील लोकांनी प्रेमनगर येथील आदिवासी बांधवांना गाव रिकामे करा, असे म्हणत गाव पेटविण्याची धमकी दिली.

ठळक मुद्दे१६ कुटुंबांचा संघर्ष : उदरनिर्वाहाच्या साधनासाठी ग्रामस्थ पुन्हा आपल्याच गावात

शंकर चव्हाण ।लोकमत न्यूज नेटवर्कजिवती : तेलंगणा आणि आंध्रप्रदेशात बंजारा आणि आदिवासी समाजात आरक्षणावरून वाद पेटला होता. त्यावेळी जिवती तालुक्यातील तेलंगणा राज्याच्या सीमेवर असलेल्या प्रेमनगर गावातील आदिवासी नागरिकांना या आरक्षणाचा फायदा मिळेल, म्हणून तेलंगणा राज्यातील लोकांनी प्रेमनगर येथील आदिवासी बांधवांना गाव रिकामे करा, असे म्हणत गाव पेटविण्याची धमकी दिली. त्यानंतर प्रेमनगर येथील नागरिक सात महिन्यांपूर्वी सेवादासनगर येथे रहायला आले. मात्र येथे रोजगाराचा प्रश्न निर्माण झाल्याने पुन्हा स्थलांतरित झालेले सर्व कुटुंब प्रेमनरात वास्तव्याला गेले आहेत.महाराष्ट्र -तेलंगणा सीमेवर गेल्या दहा वर्षांपूर्वी शेतीच्या आधारावर जगण्यासाठी सेवादासनगरवरून स्थालंतरित होऊन काही कुटुंबांनी तेलंगणातील कोलामा गावाजवळच्या शेतातच नवीन वस्ती थाटली होती. या वस्तीतील नागरिकांची नावे दोन्ही राज्यातील मतदार यादीतही नोंदविण्यात आली होती. दोन्ही राज्यातून आपला विकास होणार, अशी आशा येथील नागरिकांना होती. मात्र अचानक वर्षभरापूर्वी तेलंगणा आणि आंध्रप्रदेश राज्यात बंजारा आणि आदिवासी समाजात आरक्षणाचा वाद पेटला. आता प्रेमनगरातील ग्रामस्थही आपल्या आरक्षणाचा फायदा घेईल, असा समज झाल्याने कोलामा येथील आदिवासी समाजातील नागरिकांनी चक्क प्रेमनगर गावावर हल्ला चढवित गाव उठविले होते. गावात वातावरण तापत असताना वणी पोलिसांनी सतर्कतेची भूमिका घेत प्रेमनगरवासीयांचे समुपदेशन केले आणि त्या नागरिकांना सेवादासनगर येथे हलविण्यात आले होते. या घटनेला तब्बल सात महिन्यांचा कालावधी झाला. त्या कालावधीत त्यांच्या प्रेमनगर येथे असलेल्या शेतीचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. हाती आलेल्या पिकाची नासाडी झाली. हलाकीचे जीवन जगणाऱ्या नागरिकांना सोयी-सुविधा तर सोडाच जगण्याचा आधार प्रशासनाने दिला नाही. अखेर निराश झालेल्या स्थलांतरित नागरिकांनी पुन्हा प्रेमनगरातच जाऊन संसार थांटला आहे.प्रेमनगरात आमची शेती आहे. मात्र सेवादासनगर येथे प्रशासनाने आम्हाला स्थलांतरित केल्याने सेवादासनगर येथे राहून प्रेमनगरातील शेती करणे कठीण होत होते. त्यामुळे आम्ही पुन्हा प्रेमनगरातच वस्ती थाटली आहे.- धनराज आडे,ग्रामस्थ, प्रेमनगर.