शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
6
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
7
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
8
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
9
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
10
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
11
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
12
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
13
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
14
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
15
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
16
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
17
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
18
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
19
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
20
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
Daily Top 2Weekly Top 5

नियमात अडकले मुस्लीम समाजाचे आरक्षण

By admin | Updated: August 13, 2014 23:44 IST

सर्व समाजाची समप्रमाणात प्रगती व्हावी कोणीही वंचित राहू नये, शिक्षण, नोकरी, आदींमध्ये सर्वांचा वाटा रहावा यासाठी शासनाने आरक्षण जाहीर केले आहे. काही दिवसापूर्वी मुस्लिम आणि मराठा

साईनाथ कुचनकार - चंद्रपूर सर्व समाजाची समप्रमाणात प्रगती व्हावी कोणीही वंचित राहू नये, शिक्षण, नोकरी, आदींमध्ये सर्वांचा वाटा रहावा यासाठी शासनाने आरक्षण जाहीर केले आहे. काही दिवसापूर्वी मुस्लिम आणि मराठा समाजालाही आरक्षण दिले आहे. मात्र मुस्लिम समाजाला जातीचे प्रमाणपत्र काढताना मोठी अडचण येत आहे. त्यामुळे आरक्षण मिळूनही या समाजाला विविध योजनांचा लाभ मिळत नसल्याचे चित्र आहे. तर, दुसरीकडे अधिकारीही शासनाकडे बोट दाखवून त्यांना हेलपाटे मारावयास लावत आहे.चंद्रपूर जिल्ह्यात मोठ्या संख्येने मुस्लिम समाज आहे. या समाजामध्ये बोटावर मोजण्याइतके नागरिक सोडले तर, शैक्षणिक दृष्ट्याही समाज प्रगत नाही. त्यामुळे त्यांना शासकीय नोकरीपासूनही वंचित रहावे लागत आहे. इतर समाजाच्या तुलनेत या समाजाचीही प्रगती व्हावी यासाठी शासनाने नुकतेच आरक्षण जाहीर केले आहे. मात्र याचा लाभ घेण्यासाठी या समाजाला तारेवरची कसरत करावी लागत आहे. हे सर्व करूनही शासनस्तरावर प्रमाणपत्र देण्यासाठी टाळाटाळ केली जात आहे. मागील काही दिवसांपासून या समाजातील विद्यार्थी तसेच नागरिक सेतू केंद्रात आरक्षणासंदर्भात प्रपत्र मिळविण्यासाठी प्रयत्न करीत आहे. मात्र आपल्याकडे काहीच नसल्याचे सांगून सेतू संचालक अधिकाऱ्यांकडे बोट दाखवित आहे. त्यामुळे समाजातील नागरिक या अधिकाऱ्यांकडून त्या अधिकाऱ्याकडे जात प्रमाणत मिळविण्यासाठी चकरा मारीत आहे. शासनाने मुस्लिम समाजाला आरक्षण दिले मात्र जीआरमध्ये दिलेले नियम वेगळेच असल्याने प्रमाणपत्र देताना त्रास होत असल्याचे काही अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. तर मुस्लिम समाजाच्या विद्यार्थी किंवा इतर नागरिकांच्या शाळा सोडल्याच्या प्रमाणपत्रावर जातीचा स्पष्ट उल्लेख नसल्यामुळेच त्यांचे प्रमाणपत्र अडले असल्याचेही काहींचे म्हणणे आहे. या सर्व प्र्रकारामध्ये मागील अनेक वर्षांपासून आरक्षण मिळेल या आशेवर असलेल्या मुस्लिम बांधवांमध्ये मात्र नाराजी पसरली आहे. आता अधिकाऱ्यांनी यासंदर्भात शासनाकडून मार्गदर्शन मागितले असून ते आल्यानंतरच प्रमाणपत्र मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.