शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
4
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
5
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
6
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
7
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
8
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
9
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
10
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
11
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
12
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
13
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
14
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
15
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
16
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
17
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
18
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
19
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
20
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
Daily Top 2Weekly Top 5

३० पूर्वी थकीत कर्जाचे पुर्नगठन करावे

By admin | Updated: April 23, 2016 00:53 IST

२०१५ मध्ये खरीप पिकासाठी ज्या शेतकऱ्यांनी कर्ज घेतले होते, अशा शेतकऱ्यांनी ३१ मार्चपर्यंत कर्जाची परतफेड केली

दीपक म्हैसेकर : कर्ज वाटप संदर्भात बैठक चंद्रपूर : २०१५ मध्ये खरीप पिकासाठी ज्या शेतकऱ्यांनी कर्ज घेतले होते, अशा शेतकऱ्यांनी ३१ मार्चपर्यंत कर्जाची परतफेड केली नसेल अशा शेतकऱ्यांना त्यांच्याकडे असलेल्या पीक कर्जाचे पाच हप्ते पाडून देण्यात यावे. त्यांना पाच वर्षापर्यंत हप्त्याची परतफेड करण्याच्या सूचना देण्यात याव्या. तसेच २०१६ या खरीप हंगामासाठी थकीत कर्जदारांना ३० एप्रिलपूर्वी नव्याने पीक कर्जाचे पुर्नगठन करुन देण्यात यावे, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिले. शुक्रवारी पीक कर्ज पुर्नगठन बैठकीत ते बोलत होते. जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या जिल्ह्यातील सेवा सहकारी संस्थेचे अध्यक्ष व गटसचिव, तालुक्याचे सहाय्यक निबंधक, बॅकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व निरीक्षक यांची बैठक घेण्यात आली होती. यावेळी जिल्हा उपनिबंधक आर. डी. कौसडीकर, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी बरबटकर व जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक सुबेसिंग उपस्थित होते.२०१६ या वर्षाच्या खरीप पीक कर्जाचे पुर्नगठन करताना कोणत्याही शेतकरी कर्जापासून वंचित राहू नये, ज्या शेतकऱ्यांनी ३१ मार्च पूर्वी कर्जाची परतफेड केली आहे, अशा शेतकऱ्यांना तातडीने कर्जाचे वाटप करण्यात यावे, अशा प्रकारचे नियोजन करण्यात यावे, अशा सूचना दिल्या. (स्थानिक प्रतिनिधी)