शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
3
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
4
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
5
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
6
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
7
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
8
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
9
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
10
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
11
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
12
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
13
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
14
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
15
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
16
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
17
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
18
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
19
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
20
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

आधार कार्ड नुतनीकरण करणे ठरतेय डोकेदुखी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2020 05:00 IST

कोणत्याही कामात ओळखपत्र म्हणून आधारकार्ड अनिवार्य करण्यात आले आहे. पूर्वी आधार कार्डवर जन्मतारखेच्या जागी केवळ इ. स. चा उल्लेख होता. दिनांक व महिन्याचा उल्लेख नव्हता. मात्र आता शासनाने आधारकार्डवर दिनांक, महिना व वर्ष असलेलेच आधार कार्ड ग्राह्य पकडण्यात येत आहे. त्यासाठी अनेक ठिकाणी असलेल्या केंद्रातून आधार कार्डचे नुतनीकरण सुरु आहे. बऱ्याच केंद्रावर नागरिकांची लूट होताना दिसून येत आहे.

ठळक मुद्देजन्मतारखेचा उल्लेख गरजेचा : नुतनीकरणासाठी सेवा केंद्रात गर्दी

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : शासकीय कामात आधारकार्ड अनिवार्य करण्यात आले आहे. मात्र सदर कार्ड अद्यावत असणे गरजेचे असल्याने आधार कार्ड नुतनीकरणासाठी नागरिकांची धावपळ सुरु आहे. तर एसटी बस प्रवासात ज्येष्ठांना ५० टक्के सवलतीसाठी अद्यावत आधारकार्डची सक्ती करण्यात येत असल्याने ज्येष्ठांना उतारवयात आधार केंद्रावर हेलपाटे मारावे लागत आहेत.कोणत्याही कामात ओळखपत्र म्हणून आधारकार्ड अनिवार्य करण्यात आले आहे. पूर्वी आधार कार्डवर जन्मतारखेच्या जागी केवळ इ. स. चा उल्लेख होता. दिनांक व महिन्याचा उल्लेख नव्हता. मात्र आता शासनाने आधारकार्डवर दिनांक, महिना व वर्ष असलेलेच आधार कार्ड ग्राह्य पकडण्यात येत आहे. त्यासाठी अनेक ठिकाणी असलेल्या केंद्रातून आधार कार्डचे नुतनीकरण सुरु आहे. बऱ्याच केंद्रावर नागरिकांची लूट होताना दिसून येत आहे.आता बस महामंडळामध्ये स्मार्ट कार्ड काढण्यासाठी तसेच ५० टक्के सवलत मिळणविण्यासाठी आधार कार्ड अनिवार्य करण्यात आले आहे. सुधारीत धोरणानुसार बोगस वय नमूद करुन प्रवास करणाऱ्यांची ठकबाजी एसटी महामंडळाच्या स्मार्ट कार्डप्रणालीमुळे बंद होणार आहे. त्यासाठी आधारचे अद्ययावतीकरण आवश्यक करण्यात आले आहे. एसटी प्रवास सवलत घेणाºया बहुतांश व्यक्ती या आर्थिक स्थिती नाजूक असलेल्या गटातील असतात. त्याची चेहरेपटी वय सांगत असले तरी आधारच्या अद्यायवतीकरणाची सक्ती करण्यात आल्याने त्यांच्यापुढील अडचणी वाढल्या आहेत. बस प्रवास सवलत योजनेत महामंडळाने गेल्या काही महिन्यापासून विविध अटी टाकल्या आहेत. त्याचा सर्वांनाच फटका बसत आहे. आता ज्येष्ठ नागरिकांसाठी या अटी जाचक ठरत आहे.जन्मतारखेच्या सुधारणेसाठी मुंबईवारीआधार कार्डवरील जन्म वर्ष व दहावीनंतरच्या शाळा सोडल्याच्या दाखल्यावर जन्मतारखेत एक वर्षापेक्षा अधिकचा फरक असल्यास जन्मतारीख दुरुस्ती सेवा केंद्रातून होत नसल्यामुळे सेवा केंद्रधारक मुंबई कार्यालयात जाऊन जन्मतारखेत दुरुस्ती करण्याचा सल्ला देत आहेत. त्यामुळे अनेकांना आर्थिक फटका सहन करुन मुंबई येथे जावे लागत आहे. तर ग्रामीण भागातील नागरिकांना याचा फटका बसत आहे. त्यातही यूआयडीआय नेहमीच आपल्या आधार कार्ड संदर्भातील नियमात बदल करीत असल्याने व वेळी-अवेळी जाचक अटीमुळे आधारकार्ड आॅपरेटरसुद्धा हैराण झाले आहेत. त्यांना जनतेच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे.

टॅग्स :Adhar Cardआधार कार्ड