शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

मदतीसाठी अपघातस्थळी धावणाऱ्या नागरिकांना दिलासा

By admin | Updated: July 25, 2015 01:14 IST

मार्गात अपघात घडल्याचे दिसल्यावर संबंधितांच्या मदतीसाठी धावण्याची इच्छा असूनही पोलिसांच्या चौकशीचा उगीचच ...

मदतकर्त्यांना पुरस्कार : राज्य शासनाची अधिसूचनाचंद्रपूर : मार्गात अपघात घडल्याचे दिसल्यावर संबंधितांच्या मदतीसाठी धावण्याची इच्छा असूनही पोलिसांच्या चौकशीचा उगीचच ससेमिरा नको म्हणून थांबायचे टाळणाऱ्या संवेदनशिल नागरिकांना आता नव्या अध्यादेशामुळे दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे.घटनेच्या प्रत्यक्षदर्शी नागरिकांना आणि मदतीला धावणाऱ्या नागरिकांना अशा प्रसंगात नाहक त्रास होऊ नये यासाठी केंद्र सरकारच्या मार्ग परिवहन व राजमार्ग मंत्रालयाने १२ मे रोजी प्रसिद्ध केलेल्या राजपत्रातून ही अधिसूचना जारी केली आहे. रस्ते अपघातातील जखमींना तात्काळ वैद्यकीय उपचार मिळावे व मदतीला धावणाऱ्या कर्तव्यदक्ष नागरिकांना त्रास होऊ नये याबाबत या अधिसूचनेत महत्वाच्या सूचना करण्यात आल्या आहेत.रस्ते अपघातात जखमी व्यक्तींच्या मदतीसाठी पुढे येणाऱ्या कर्तव्यदक्ष नागरिकांसाठी राज्य सरकारने पुरस्कार देण्याचीही तयारी दर्शविली आहे. मदतकर्त्या नागरिकांना अपघाताच्या गुन्ह्यात गोवले जाणार नाही, अपघाताची सूचना फोनवरून देणाऱ्या व्यक्तीला व्यक्तीगतरित्या पोलीस ठाण्यात उपस्थित राहण्याची सक्ती केली जाणार नाही, अपघाताच्या गुन्ह्यात प्रत्यक्षदर्शीच्या पुराव्याची आवश्यकता असल्यास केवळ एकदाच चौकशी करण्यात यावी, असे या नव्या अध्यादेशात म्हटले आहे.अपघातामध्ये जखमी झालेल्या व्यक्तीला रुग्णालयात घेऊन जाणाऱ्या नागरिकांना डॉक्टरांनी अनावश्यक प्रश्न विचारु नये अथवा कुठल्याही वैद्यकीय शुल्काची मागणी करु नये, असेही यात नमुद आहे. महत्त्वाचे म्हणजे, अपघातातील जखमी व्यक्तींवर डॉक्टरांनी तात्काळ उपचार करणे आवश्यक आहे, हे लक्षात घ्यावे. त्यासाठी मदतकर्त्या नागरिकांना पैसे जमा करण्यास सांगूू नये, अशा आशयाची पाटी सर्वच खासगी व शासकीय रुग्णालयात लावण्यात यावी असेही निर्देश या अधिसूचनेत देण्यात आले आहेत. रस्ते अपघातात जखमी झालेल्या व्यक्तींना प्रत्यक्षदर्शी किंवा कर्तव्यदक्ष नागरिक जवळच्या रुग्णालयात घेऊन जावू शकतात. यासाठी त्यास अडविण्याची किंवा प्रश्न विचारण्याची गरज नसल्याचे अधिसूचनेत नमुद आहे. कर्तव्यदक्ष नागरिकांना यापुढे त्रास सहन करावा लागणार नाही, अशी सरकारची अपेक्षा आहे. (जिल्हा प्रतिनिधी)