शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

हत्तीरोग मुक्तीसाठी सर्व यंत्रणांनी योग्य नियोजन करावे

By admin | Updated: December 9, 2014 22:48 IST

हत्ती रोगाच्या मुक्तीसाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करणे गरजेचे आहे. ही मोहीम यशस्वी करण्यासाठी सर्व यंत्रणांनी योग्य नियोजन करावे, नागरिकांना डी.ई.सी. व अल्बेंडाझोल गोळ्यांबद्दलचे फायदे व माहिती

चंद्रपूर : हत्ती रोगाच्या मुक्तीसाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करणे गरजेचे आहे. ही मोहीम यशस्वी करण्यासाठी सर्व यंत्रणांनी योग्य नियोजन करावे, नागरिकांना डी.ई.सी. व अल्बेंडाझोल गोळ्यांबद्दलचे फायदे व माहिती पटवून द्यावी, असे मत जिल्हाधिकारी डॉ. दीपक म्हैसेकर यांनी व्यक्त केले.हत्तीरोग निर्मूलन समन्वय समितीची सभा जिल्हाधिकारी डॉ. दीपक म्हैसेकर यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी जिल्हा क्षय रोग अधिकारी डॉ. दीपक सेलोकर, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. डी.टी. नन्नावरे, हत्ती रोग अधिकारी आर.डी. टोंगे, मनपाच्या नोडल अधिकारी डॉ. अंजली आंबटकर, डॉ.जी.एम. मेश्राम व जिल्हा महिला बालकल्याण अधिकारी उपस्थित होते.या गोळ्यांचा लाभ जास्तीत जास्त नागरिकांनी घ्यावा असे आवाहनही जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील नागरिकांना केले. राष्ट्रीय हत्तीरोग दिवसानिमित्त जिल्ह्यातील १४ ते १८ डिसेंबर या कालावधी डी.ई.सी. व अल्बेंडाझोल गोळ्यांचे वाटप करण्यात येणार आहे. यामध्ये ग्रामीण भागात १४ ते १६ डिसेंबर या तीन दिवसात तर शहरी भागात १४ ते १८ डिसेंबर या पाच दिवसात या गोळ्यांचे वाटप करण्यात येणार आहे. कर्मचाऱ्यांमध्ये आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, आंगणवाडी कार्यकर्ती, आशा व अनुभवी स्वयंसेवक हे राहणार असून त्यांना या मोहिमेपूर्वी प्रशिक्षण देण्यात येईल. या कर्मचाऱ्यांवर आरोग्य सहाय्यक, आरोग्य पर्यवेक्षक, तालुका पर्यवेक्षक, औषध निर्माण अधिकारी, शालेय आरोग्य वैद्यकीय अधिकारी, आयुष डॉक्टर व आशा समन्वयक हे पर्यवेक्षक म्हणून काम पाहणार आहेत. या गोळ्यांचे हत्तीरोग संवेदनशील क्षेत्रातील प्रत्येक व्यक्तीने वर्षातून एकदा या गोळ्यांचे सेवन करावे. तसेच दोन वर्षाखालील बालके, गर्भवती माता व अतिगंभीर आजारी व्यक्तींना या गोळ्या सेवन करण्यास देऊ नये असे संबंधित यंत्रणेला सुचना दिल्या आहेत. हत्तीरोगासंबंधीचे औषध विनामूल्य असून अधिक माहितीकरिता जवळील आरोग्य केंद्राशी संपर्क साधावा, अशी विनंती यावेळी करण्यात आली. (नगर प्रतिनिधी)