शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
4
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
5
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
6
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
7
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
8
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
9
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
10
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
11
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
12
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
13
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
14
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
15
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
16
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
17
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
18
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
19
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
20
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
Daily Top 2Weekly Top 5

पहिल्याच मासिक सभेत जमाखर्च नामंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2021 04:24 IST

: पोलीस स्टेशनमार्फत गुन्हे शाखेला दिली तक्रार मासळ बु. : स्थानिक मासळ ग्रामपंचायतीमध्ये नव्यानेच निवडून आलेल्या सर्व सदस्यांची ...

:

पोलीस स्टेशनमार्फत गुन्हे शाखेला दिली तक्रार

मासळ बु. :

स्थानिक मासळ ग्रामपंचायतीमध्ये नव्यानेच निवडून आलेल्या सर्व सदस्यांची पहिली मासिक सभा आर्थिक व्यवहार तपासणे व जमा खर्च मंजूर करणे या विषयावर झाली; परंतु ग्रामसेवक प्रशांत लामगे यांनी जमाखर्च दाखविला नाही व विचारलेल्या प्रश्नाची उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे पहिल्याच मासिक सभेत जमाखर्च नामंजूर करून आर्थिक गुन्हे शाखा चंद्रपूरद्वारे चौकशी करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला.

त्यामुळे ग्रामपंचायतीमध्ये लाखो रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप सरपंचासह सदस्यांनी केल्याने गावात खळबळ उडाली आहे.

परंतु ठरावाची प्रत न देता ग्रामसेवक सभेमधून पळून गेले. तेव्हा २८ मार्चला पोलीस स्टेशन चिमूरमार्फत पोलीस अधीक्षक आर्थिक गुन्हे शाखा चंद्रपूर यांना सरपंच, उपसरपंच व सर्व सदस्यांनी तक्रार दाखल केली आहे.

चिमूर पंचायत समितींतर्गत येत असलेल्या ग्रामपंचायत मासळ येथे नवनियुक्त सरपंच, उपसरपंच आणि सर्व सदस्य यांची २६ मार्चला पहिली मासिक सभा आर्थिक व्यवहार तपासणे व जमा खर्च तपासणे या विषयावर झाली. यात ग्रामसेवकाला हिशोब मागितला असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे देत सभेतून पळ काढला. यात गृह कर, पाणीकर, सामान्य पावती कर आणि 14 वा वित्त आयोग याचा किती निधी प्राप्त झाला व खर्च किती, याचा हिशोब पाहिला असता यामध्ये भ्रष्टाचार झाल्याचे उघड झाले.

बॉक्स

या खर्चाचा तपशीलच नाही

सन २०१९-२० या आर्थिक वर्षात गृहकर पाच लाख ४० हजार ८५८ रुपये, पाणी कर एक लाख ५९ हजार ८१८ रुपये, दुकान गाळे किराया एक लाख २५ हजार आणि १४ वा वित्त आयोग चार लाख ४० हजार २५६ रुपये एवढा आहे; परंतु सदर खर्चाचे तपशील ग्रा.पं. कमिटीला दिले नाही. सदर रकम जमा न करता परस्पर खर्च केली आहे, असे निदर्शनास आले. त्यामुळे या आर्थिक व्यवहाराची चौकशी करून गैरव्यवहार व भ्रष्टाचार करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी, अशी ग्रा.पं. मासळच्या संपूर्ण कमिटीने केली आहे. सदर प्रकरण माहितीसाठी मुख्य कार्यकारी अधिकारी यांना सादर केले आहे.