शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
2
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
3
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
4
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
5
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
6
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
7
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
8
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
9
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
10
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
11
अमेरिका-इराण चर्चा निष्फळ! पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया आली समोर; परराष्ट्र मंत्री इशाक डार म्हणाले...
12
“चंदेरी दुनियेच्या सफरीचा आनंद देणारा दैवी आवाज शांत झाला”; DCM शिंदेंकडून आशाताईंना आदरांजली
13
Asha Bhosale Songs: आशा भोसलेंची 'ही' गाणी प्रचंड गाजली! आजही ऐकली की चेहऱ्यावर हसू अन् डोळ्यांत पाणी येतं
14
आशा ताईंना सर्वात जास्त प्रिय होता 'डाळ-भात', स्वतः बनवायच्या 'हे' खास लोणचं; साध्या राहणीमानानंही जिंकली चाहत्यांची मनं
15
२० भाषा अन् १२ हजारांहून अधिक गाणी! 'असा' होता आशा भोसले यांचा संगीत विश्वातील प्रवास
16
"अशा बॉसना देव सुखी ठेवो!"; तरुणीला झाली आंबे खाण्याची इच्छा, थेट घरी पोहोचल्या पेट्या
17
बाप रे! शाळेत घुसल्या हजारो मधमाश्या, परीक्षेचे पेपर सोडवणाऱ्या मुलांवर केला हल्ला; एका चिमुकल्याचा मृत्यू
18
ज्या आवाजाने कोट्यवधी रसिकांचं मन जिंकलं, त्यांच्याच हातची चवही होती कमाल! आशाताईंनी उभारलं होतं हॉटेल साम्राज्य
19
Asha Bhosale Death: आशा भोसले यांच्या निधनानंतर मुलाची भावूक प्रतिक्रिया; अंत्यसंस्काराबाबत दिली महत्त्वाची माहिती
20
सावंतवाडीमध्ये मद्यधुंद टेम्पो चालकाची दुचाकीला धडक; चिमुकलीचा जागीच मृत्यू, आई जखमी
Daily Top 2Weekly Top 5

आश्रमशाळा हस्तांतरणासाठी साकडे

By admin | Updated: June 13, 2017 00:32 IST

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी १९५८ ला अहेरी तालुक्यातील कमलापूर येथे आश्रमशाळेची स्थापना केली.

राष्ट्रसंतांची आश्रमशाळा : गुरुदेवभक्तांचे पालकमंत्र्यांना निवेदनलोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी १९५८ ला अहेरी तालुक्यातील कमलापूर येथे आश्रमशाळेची स्थापना केली. परंतु सदर आश्रमशाळा २५ जून २००३ ला माजी राज्यमंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्या भगवंतराव मेमोरीयल शिक्षण संस्थेला हस्तांतरित करण्यात आली. यामुळे राष्ट्रसंतांच्या मूळ हेतुला ठेच पोहोचली असून आश्रमशाळा परत गुरुदेव भक्तांकडे सोपविण्यात यावी, अशी मागणी गुरुदेवभक्तांनी वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे केली आहे.अखिल भारतीय गुरुकुंज आश्रम मोझरी जि. अमरावती यांच्या मार्फतीने सदर शाळेचे हस्तांतरण करण्यात आले. सन १९५८ ची परिस्थिती पाहून महाराजांनी आदिवासीसाठी निवासी आश्रमशाळा सुरु केली होती. आदिवासी बांधवांच्या पाल्यांना विनामुल्य आणि परिस्थितीनुरुप शिक्षण मिळावे, हा उदात्त हेतू ठेवून व त्या भागाच्या शैक्षणिक विकासाकरिता राष्ट्रसंतांनी शैक्षणिक संस्था सुरु केली. परंतु काही स्वार्थी व्यक्तीनी ती शाळा विकून राष्ट्रसंतांच्या भावनांचे अवमुल्यन केले. एका अर्थाने महाराजांच्या हेतूला ठेच पोहचली आहे. त्यानुसार चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील गुरुदेवभक्त व गुरुदेवप्रेमीच्या भावना दुखावल्या.सदर आश्रमशाळा धर्मरावबाबा आत्राम हे परत करण्यास तयार आहेत. याकरिता शासकीय स्तरावरुन या समस्येचा निपटारा व्हावा, ही अपेक्षा बाळगून सर्व गुरुदेवप्रेमी नगरसेवक सुभाष कासनगोट्टूवार, गुरुदेव सेवा मंडळ तुकूमचे अध्यक्ष नत्थू बावणे यांच्या नेतृत्वात ना. मुनगंटीवार यांची भेट घेवून निवेदन दिले. यावेळी देवराव बोबडे, नामदेव लांजेकर, अवघडे, वसंतराव धंदरे, बबनराव मत्ते, सुरेश बेलखेडे, आनंद मांदाडे, वनकर, रासेकर, रामराव धारणे, कृष्णराव नन्नावरे, विठ्ठल गौरकार, तुळशिराम बरडे, कुंदाजेवार, अलमुलवार, पुरुषोत्तम राऊत, पारखी, गुलाब राऊत, नानाजी नन्नावरे, किशोर गराटे, विश्वनाथ राजनहिरे, देहारकर, माया बोबडे, माया मांदाडे, धारणे, जीवतोडे, बावणे, खेडेकर, भोकरे, निखार, विरुटकर, जोगी, श्रीरामोजवार, राऊत, पिदुरकर, आमडे आदीसह गुरुदेव भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.