शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
2
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
3
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
4
“चंदेरी दुनियेच्या सफरीचा आनंद देणारा दैवी आवाज शांत झाला”; DCM शिंदेंकडून आशाताईंना आदरांजली
5
Asha Bhosale Songs: आशा भोसलेंची 'ही' गाणी प्रचंड गाजली! आजही ऐकली की चेहऱ्यावर हसू अन् डोळ्यांत पाणी येतं
6
आशा ताईंना सर्वात जास्त प्रिय होता 'डाळ-भात', स्वतः बनवायच्या 'हे' खास लोणचं; साध्या राहणीमानानंही जिंकली चाहत्यांची मनं
7
२० भाषा अन् १२ हजारांहून अधिक गाणी! 'असा' होता आशा भोसले यांचा संगीत विश्वातील प्रवास
8
"अशा बॉसना देव सुखी ठेवो!"; तरुणीला झाली आंबे खाण्याची इच्छा, थेट घरी पोहोचल्या पेट्या
9
बाप रे! शाळेत घुसल्या हजारो मधमाश्या, परीक्षेचे पेपर सोडवणाऱ्या मुलांवर केला हल्ला; एका चिमुकल्याचा मृत्यू
10
Asha Bhosle: ज्या आवाजाने जग जिंकलं, त्यांच्याच हातच्या चवीने हॉटेल साम्राज्य उभं केलं
11
शांततेचे प्रयत्न अपयशी! इराणसाठी ट्रम्प यांचा खतरनाक 'प्लॅन बी' तयार; भारताच्या तेल पुरवठ्यावरही संकट?
12
Asha Bhosale Death: आशा भोसले यांच्या निधनानंतर मुलाची भावूक प्रतिक्रिया; अंत्यसंस्काराबाबत दिली महत्त्वाची माहिती
13
सावंतवाडीमध्ये मद्यधुंद टेम्पो चालकाची दुचाकीला धडक; चिमुकलीचा जागीच मृत्यू, आई जखमी
14
"इराणने आम्हाला संपवण्याची धमकी दिली, आता स्वतःच...!" शांतता चर्चा फिसकटल्याने नेतन्याहू भडकले
15
शांतता चर्चा फिस्कटल्याने डोनाल्ड ट्रम्प चिडले; आता इराणची खैर नाही, घेराव टाकण्याची दिली धमकी
16
NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक
17
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
18
डॉक्टर, मला मृत्यू हवाय..., लिविंग विल हा पर्याय किती उपयुक्त?
19
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
20
सुविधा देताना रेल्वेचे 'सावत्र' प्रेम!; मध्य-पश्चिम रेल्वेत दुजाभाव होतोय, प्रवाशांची भावना
Daily Top 2Weekly Top 5

गायीच्या दूधाचे नित्य सेवन, समृद्ध जीवन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2018 01:15 IST

आईच्या दुधानंतर मनुष्यासाठी गायीचे दूध हे सर्वोत्तम मानले जाते. दुधात बरीच पोषकतत्वे असल्यामुळे दुधाला पूर्ण अन्नाचा दर्जा दिलेला आहे. आजच्या शहरी जीवन संस्कृतीमुळे देशी गाई पाळण्याचे प्रमाण कमी झालेले आहे. मात्र ग्रामीण भागातील शेतकरी कुटुंबात आजही किमान एक तरी गाय असतेच.

ठळक मुद्देजागतिक दुग्ध दिन : प्रत्येक व्यक्तीला २४० मिलीलिटर दुधाची गरज

वतन लोणे।लोकमत न्यूज नेटवर्कघोडपेठ : आईच्या दुधानंतर मनुष्यासाठी गायीचे दूध हे सर्वोत्तम मानले जाते. दुधात बरीच पोषकतत्वे असल्यामुळे दुधाला पूर्ण अन्नाचा दर्जा दिलेला आहे. आजच्या शहरी जीवन संस्कृतीमुळे देशी गाई पाळण्याचे प्रमाण कमी झालेले आहे. मात्र ग्रामीण भागातील शेतकरी कुटुंबात आजही किमान एक तरी गाय असतेच. देशी गायीच्या दुधामध्ये शरिराला आवश्यक असणारी बरीच पोषकतत्वे असतात. म्हणूनच नियमित दूध पिणाऱ्यांना ‘गायीच्या दुधाचे नित्य सेवन, समृध्द जीवन’ याची प्रचिती येतेच.दूध आणि दुधाशी संबंधित खाद्यपदार्थांचा प्रचार व प्रसार करण्याच्या उद्देशाने दरवर्षी १ जून हा दिवस जागतिक दुग्ध दिन म्हणून पाळला जातो. डॉ. वरगीस कुरीयन यांचा आज जन्मदिवस. त्यांना श्वेतक्रांतीचा जनकही मानले जाते. ते 'अमूल'चे संस्थापक होते. त्यांच्या नेत्रदीपक कामगिरीबद्दल भारत सरकारतर्फे त्यांना पद्मभूषण व पद्मश्री पुरस्काराने सन्मानितही करण्यात आलेले आहे. गेल्या काही वर्षांपासून शेतकरी आत्महत्यांच्या निमित्ताने शेतकºयांनी शेतीसोबतच जोडधंदा करावा, असे सरकारतर्फे वारंवार सांगितले जात आहे. दुग्ध व्यवसायासोबतच पशुपालन या जोडधंद्यांमुळे शेतकºयांच्या आर्थिक परिस्थितीत समाधानकारक बदल झालेला आहे.जास्तीत जास्त व स्वच्छ दूध उत्पादन झाले पाहिजे, या उद्देशाने शासनाद्वारे एनडीडीबीच्या माध्यमातून मदर डेअरीची स्थापना करून तसेच पशुपालकांच्या डेअरीच्या माध्यमातून गाईंचे वाटप करण्यात येत आहे. एका व्यक्तीला दररोज २४० मिलि दुधाची गरज आहे. मात्र प्रति व्यक्ती १४० मिलि दुधाचे उत्पादन होत आहे. त्यामुळे दूध उत्पादनाकरिता प्रोत्साहन देणे गरजेचे आहे. कृत्रिम रेतनाच्या माध्यमातून शासन दुग्धोत्पादन वाढविण्यासाठी प्रयत्न करत आहे.गावठी गायीच्या दुधामध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम, झिंक, फॉस्फरस, आयोडीन, आयरन, पोटॅशियम, फोलेट्स, विटामीन ए, विटामीन डी, राइबोफ्लेविन, विटामीन बी-१२, प्रोटीन, स्वस्थ फॅट इत्यादी उपलब्ध असतात. हा अत्यंत ऊर्जायुक्त आहार आहे. ज्यामुळे शरिराला ताबडतोब ऊर्जा उपलब्ध होते. सोबतच दुधामध्ये उच्च गुणवत्तेचे प्रोटीन तसेच आवश्यक व गैर-आवश्यक अमिनो अ‍ॅसिड व फॅटी अ‍ॅसिड सुध्दा उपलब्ध असतात.गरम दूध पिल्याने शारीरिक तणाव दूर होतो. एक ग्लास गरम दूध पिल्यास अनिद्रेचा त्रास कमी होतो. गुळ व दूध गरम करून पिल्यास शरिरात असलेली विषारी द्रव्ये बाहेर निघतात, त्वचा उजळते, वजन नियंत्रणात राहते. केळ व दूध मिसळून पिल्यास दिवसभर उर्जा मिळते. बदाम बारिक करून दूधात सेवन केल्यास डोकं, हृदय व डोळ्यांना फायदा होतो. असे दूधाचे अनेक फायदे आहेत. चला तर मग, जागतिक दुग्ध दिनाच्या निमित्ताने आजपासून दररोज कमीतकमी एक ग्लास दूध प्यायला सुरूवात करा.आईच्या दुधानंतर गावठी गाईच्या दुधाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. दूध हे पूर्ण अन्न आहे. त्यात भरपूर ऊर्जा स्रोत आहे. त्यामुळे नागरिकांनी आपल्या आहारात भरपूर दूध वापरावे. पशु पालकांनी दुधाचे भरपूर उत्पन्न घेऊन नागरिकांचे आरोग्य व आपले उत्पन्न वाढवावे.- डॉ. नंदकिशोर मैंदळकर, पशुवैद्यकीय अधिकारी, घोडपेठ.

टॅग्स :milkदूध