शहरं
Join us  
Trending Stories
1
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
2
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
3
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यापूर्वी दहशतवाद्यांनी दाखवलं मॅगी, मोमोजचं आमिष; महिलेचा धक्कादायक खुलासा
4
रशियाने १९७२ साली सोडलेला उपग्रह नियंत्रण सुटून पृथ्वीवर कोसळणार, इथे होऊ शकते धडक, संपूर्ण जगाची चिंता वाढली   
5
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
6
आता थांबायचं नाय! 'धर्मवीर' फेम मराठी अभिनेत्याने घेतली शानदार 'थार'; मुलीच्या आनंदाला उधाण
7
पुण्यात आल्यावर मुंबईच्या तरुणीला पटवलं, शरीरसंबंधही ठेवले; नंतर तिच्याच मैत्रिणीसोबत...
8
भयंकर! नवरा-नवरीसोबत आक्रित घडलं, कारला भीषण आग; ७ जणांनी उड्या मारुन वाचवला जीव
9
वैभव सूर्यवंशीने ठोकलं विक्रमी शतक, पण आता लागू शकते क्रिकेटबंदी; खेळाडूच्या आरोपाने चर्चांना उधाण
10
टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसंदर्भात ICC ची मोठी घोषणा; सलामीच्या लढतीसह फायनलची तारीख ठरली!
11
छाया कदम यांनी 'ती' गोष्ट अभिमानाने सांगितली अन् अडचणी वाढल्या; अभिनेत्रीची होणार चौकशी
12
Traffic News: पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवर मोठी वाहतूक कोंडी, ५ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा
13
अरे व्वा! रुग्णालयात अनोखा विवाहसोहळा, आजारी वधूला उचलून घेऊन नवरदेवाने घेतल्या सप्तपदी
14
'वेव्हज हे फक्त नाव नाही तर...'; PM मोदींनी WAVES परिषदेमध्ये मनोरंजन क्षेत्रासाठी केली मोठी घोषणा
15
Nagpur: मित्राचा वाढदिवस ठरला आयुष्यातील शेवटचा दिवस, स्विमिंग पूलमध्ये बुडून तरुणाचा मृत्यू
16
“राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येत असतील तर...”; मनसे-ठाकरे गट युतीवर काँग्रेस नेते थेट बोलले
17
एआयमुळे २०००० नोकऱ्या मिळणार, Cognizant २०२५ मध्ये फ्रेशर्सची भरती करणार
18
“उद्धव-राज ठाकरे दोघेही भावासमान, महाराष्ट्र हितासाठी मनाचा मोठेपणा दाखवत...”: सुप्रिया सुळे
19
Video - अरे बापरे! टँकर पलटताच तेल लुटण्यासाठी बादल्या, कॅन घेऊन लोकांची झुंबड
20
नाशिक: पोलिसांच्या हाताला झटका देऊन पळालेला क्रिश सापडला, कुठे बसला होता लपून?

4,779 बेरोजगारांची नोंदणी; 1,358 उमेदवारांना रोजगार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2020 05:00 IST

कोरोनाचा संसर्ग होऊ नये, यासाठी  शासनाने लाॅकडाऊन केले. या कालावधीत हजारो नागरिकांचा रोजगार बुडाला. युवक- युवतींना रोजगारा मिळण्याचे मार्ग बंद झाले. आयुष्य कसे उभे करायचे हा प्रश्न पुढे आला होता. याच कालावधीत  शासनाच्या सूचनेनुसार जिल्हा रोजगार व स्वयंरोजगार विभागाकडे बेरोजगारांची नोंदणी सुरू होती. जिल्ह्यात ४ हजार ७७९ बेरोजगारांनी नोंदणी केली. या बेरोजगारांना व्यवसाय काैशल्य विकासाचे प्रशिक्षण मिळाले.

ठळक मुद्दे लाॅकडाऊन काळातील स्थिती : युवक-युवतींना स्वयंरोजगाराचे धडे

  लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर  : कोरोना लाॅकडाऊन कालावधीत  जिल्हा रोजगार व स्वयंरोजगार विभागात ४ हजार ७७९ बेरोजगार युवक-युवतींनी रोजगारासाठी  नोंदणी केली होती. यातील १ हजार ३५८ उमेदवारांना रोजगार मिळाला. काही युवकांनी स्वयंरोजगार सुरू करून बेरोजगारीवर मात केली आहे. कोरोनाचा संसर्ग होऊ नये, यासाठी  शासनाने लाॅकडाऊन केले. या कालावधीत हजारो नागरिकांचा रोजगार बुडाला. युवक- युवतींना रोजगारा मिळण्याचे मार्ग बंद झाले. आयुष्य कसे उभे करायचे हा प्रश्न पुढे आला होता. याच कालावधीत  शासनाच्या सूचनेनुसार जिल्हा रोजगार व स्वयंरोजगार विभागाकडे बेरोजगारांची नोंदणी सुरू होती. जिल्ह्यात ४ हजार ७७९ बेरोजगारांनी नोंदणी केली. या बेरोजगारांना व्यवसाय काैशल्य विकासाचे प्रशिक्षण मिळाले.  जिल्ह्यात व राज्यभरात उपलब्ध होणा-या  विविध आस्थापनांमधील रोजगार व नोक-यांची माहिती देण्यात आली. त्यामुळे १ हजार ३५८ बेरोजगारांना नोकरी मिळाली. लाॅकडाऊन हा संकटांचा कालावधी  होता.  या कालावधीत रोजगार मिळवून दिल्याचा दावा प्रशासनाने केला आहे.

अधिकाऱ्याचा कोटजिल्ह्यात १ माचर्च ते ३० नोव्हेंबर दरम्यान नोंदणी केलेल्या १ हजार ३५८ बेरोजगार उमेदवारांना नाेकरी उपलब्ध करून देण्यात आली. बेरोजगारांना सन्मानाने जीवन जगता यावे, यासाठी शासनाने अनेक योजना सुरू केल्या. विविध प्रकारचे प्रशिक्षण दिले जात आहेत. कोरोना कालावधीत ऑनलाईन प्रशिक्षण घेण्ण्यावर विशेष लक्ष देण्यात आले. याचाही युवक-युवतींनी लाभ घेतला आहे.        - भय्याजी येरमे, सहाय्यक आयुक्त काैशल्य रोजगार व उद्योजकता, चंद्रपूर

माच महिन्यात ८०३ जणांची नाेंदणीचंद्रपूर हा उद्योगप्रधान जिल्हा म्हणून ओळखला जातो. नोंदणीकृत उद्योग संस्थांची संख्या बरीच आहे. मात्र, लाॅकडाऊन सुरू झाल्याने उद्योगांवर मरगळ आली. या तणावग्रस्त काळातील मार्च महिन्यातही ८०३ बेरोजगारांनी जिल्हा रोजगार व स्वयंरोजगार विभागात नोंदणी केली.  एप्रिल ४२, मे ७७, जून ४७४, जुलै २०८८, ऑगस्ट ४७४, सप्टेंबर ४७१, आऑक्टोबर १९५, नोव्हेंबर १५५ अशी महिनानिहाय नोंदणी करण्यात आली आहे. लाॅकडाऊन काळात सवर्वत्र बंद असल्याने शासनाच्या आदेशानुसार बेरोजगार युवक-युवतींसाठी ऑनलाइईन प्रशिक्षण घेण्यात आले. बेरोजगारांनी या प्रशिक्षणाचाही लाभ घेऊन स्वयंरोजगार योजनांचा लाभ घेतला.

तरूण काय म्हणतात?

कोरोनामुळे सवर्वच क्षेत्रावर विघातक परिणाम झाला. मात्र, बेरोजगारांचे मोठे हाल सुरू आहेत. शिक्षणाचे प्रमाण वाढले. मात्र, त्या तुलनेत रोजगार उपलब्ध नाही. राज्य सरकारने केवळ आश्वासने न देता बेरोजगारीसाठी ठोस  धोरण तयार केले पाहिजे. - श्रीकांत भेंडे, चंद्रपूर

जिल्ह्यात बेरोजगारी वाढली. युवक-युवतींच्या हाताला काम नाही. त्यामुळे ते प्रचंड निराशेत आहेत. जिल्हा रोजगार व स्वयंरोजगार विभागातून योजनांची माहिती मिळते. परंतु, व्यवसाय सुरू करण्यास बँकांकडून खुल्या मनाने मदत मिळत नाही. हे चित्र बदलावे.  - अंतबोध बोरकर, सावली

मुलींच्या शिक्षणाचे प्रमाण वाढले आहे. विशेष म्हणजे, गुणवत्तेतही पुढे आहेत. जिल्ह्यात रोजगाराच्या संधी अत्यंत कमी आहेत. त्यामुळे पुणे- मुंबईकडे जावे लागते. परंतु, अनेकांना हे शक्य होईलच याची खात्री नाही. त्यामुळे जिल्ह्यातील बेरोजगारांना येथेच रोजगार मिळाला पाहिजे.- प्रणाली जांभुळे,  बाबुपेठ, चंद्रपूर

 

टॅग्स :Unemploymentबेरोजगारी