शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
2
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; ६ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
3
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
4
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
5
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
6
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
7
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
8
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
9
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
10
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
11
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
12
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
13
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
14
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
15
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
16
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
17
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
18
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
19
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
20
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
Daily Top 2Weekly Top 5

प्रादेशिक पाणीपुरवठा नळयोजना कुचकामी

By admin | Updated: May 5, 2016 01:29 IST

पोंभुर्णा तालुक्यातील देवाडा बुज. याठिकाणी शासनाची प्रादेशिक नळयोजना अस्तित्वात आहे.

तीन गावात पाणी टंचाई : नागरिक त्रस्तदेवाडा (बु) : पोंभुर्णा तालुक्यातील देवाडा बुज. याठिकाणी शासनाची प्रादेशिक नळयोजना अस्तित्वात आहे. या योजनेत देवाडा बुज. गावासह बोंडाळा बुज., बोंडाळा खुर्द आदी गावे अंतर्भूत आहेत. परंतु, तिन्ही गावातील पाणीपुरवठा मागील एक महिन्यापासून कायमचा बंदस्थितीत असल्याने या गावातील नागरिकांवर पिण्याच्या पाण्याचे संकट उभे ठाकले आहे. उन्हाच्या तीव्र दाहकतेने परिसरातील पाण्याचे जलस्त्रोत आटले असून जलवहिन्या ठप्प झाल्या. गावात पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई असल्याने येथील महिला वर्ग व सर्वसामान्य नागरिकांना पाण्यासाठी इतरत्र भटकण्याची पाळी आली आहे. तीनही गावात पिण्याच्या शुद्ध पाण्यासाठी हाहाकार असल्याने पिण्याच्या पाण्याची सर्वत्र झळ पोहचली आहे. जनावरांनासुद्धा पाणी मिळणे या गावात कठीण काम झाले आहे. पाणी हे जीवन असून पाण्याविना जीवन कासाविसा होत असते. पिण्याच्या पाण्याची मूलभूत गरज समजल्या जाऊन त्याची पूर्तता करणे अत्यंत गरजेचे झाले आहे. परंतु शासनाचा पाणीपुरवठा विभागाने उन्हाळ्याच्या दिवसातच दुर्लक्ष केल्याने पाणी टंचाईची समस्या गावात निर्माण झाली आहे. या मात्र अधिकारी मुद्दाम डोळेझाक करीत असल्याचे आरोप नागरिकांकडून केल्या जात आहे. जिल्हा प्रशासनाच्या पाणीपुरवठा विभाग वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे पाठ फिरवून पाणी टंचाईवर उपाययोजना करण्यास असमर्थ ठरले आहे. तीनही गावातील जनतेला पिण्याच्या पाण्याची भटकंती करावी लागत असल्याने प्रशासनाप्रती असंतोषाची लाट पसरली आहे. त्यामुळे घागर मोर्चा काढण्याचा इशारा गावकऱ्यांनी दिला आहे. गावात पाणी टंचाई असल्याने देवाडा बुज. येथील नागरिक एक किमी अतरावर असलेल्या वैनगंगा उपनदीकडे पिण्याच्या पाण्यासाठी पायपीट सुरू केली आहे. काही जण तर चक्क बैलबंडी जुंपून पाणी आणत आहेत. परिसरात पाणी टंचाईचा प्रश्न बिकट असून पाणी पुरवठा विभागाचे वरिष्ठ अधिकारी कुंभकर्णी झोपेत आहे की काय असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केल्या जात आहे.याकडे प्रशासनाने वेळीच लक्ष देऊन गावातीलल पाणी समस्या सोडविण्याची मागणी होत आहे. (वार्ताहर)