शहरं
Join us  
Trending Stories
1
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
2
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
3
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
4
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
5
महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
6
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
7
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
8
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
9
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
10
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
11
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
12
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
13
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
14
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
15
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
16
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
17
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
18
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
19
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
20
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
Daily Top 2Weekly Top 5

अर्ध्या एकरात शेतकऱ्याने घेतले कारल्याचे विक्रमी उत्पादन; आधुनिक पद्धतीने केली शेती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2020 20:25 IST

राजुरा तालुक्यातील वरोडा येथील शेतकरी किशोर नांदेकर यांनी आपल्या शेतातील अर्ध्या एकरात कारल्याची लागवड केली होती. यात त्यांनी आधुनिक पध्दतीचा अवलंब केला. या शेतीतून त्यांना यंदा विक्रमी उत्पादन मिळत आहे.

ठळक मुद्देवरोडा येथील शेतकऱ्यांची यशोगाथा

प्रकाश काळेलोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर: अस्मानी आणि सुलतानी संकटांनी शेतीची अवस्था अधिकच बिकट होत असतानाच राजुरा तालुक्यातील वरोडा येथील शेतकरी किशोर नांदेकर यांनी आपल्या शेतातील अर्ध्या एकरात कारल्याची लागवड केली होती. यात त्यांनी आधुनिक पध्दतीचा अवलंब केला. या शेतीतून त्यांना यंदा विक्रमी उत्पादन मिळत आहे.राजुरा तालुक्यातील वरोडा येथील प्रगतशील शेतकरी किशोर नांदेकर हे आपल्या शेतात दरवर्षी नवनव्या पध्दतीने विविध पिकांची लागवड करीत असतात. शेतकरी किशोर नांदेकर यांची वरोडा-नवेगाव या मुख्य रस्त्यालगत सात एकर शेती आहे. नांदेकर यांचे संयुक्त कुटुंब असल्याने घरातील मंडळी शेतात दिवसरात्र राबत असतात. घरातील प्रत्येक सदस्याला शेतीची कामे वाटून देण्यात आलेली आहे. त्यामुळे प्रत्येकजण आपापली जबाबदारी समजून शेतीची कामे करतात. त्यांच्या सात एकर शेतीत ते विविध प्रकारच्या पिकांची लागवड करतात. त्यांनी शेतात कापूस, तूर, सोयाबीन या प्रमुख पिकांसह कारली, हळद, ढेमसे, शेंगा, कोबी, टमाटर, वांगे या पिकांसह भाजीपाला पिके घेतली आहेत.किशोर नांदेकर यांनी आपल्या अर्ध्या एकर शेतात कारल्याची लागवड केली आहे. यासाठी त्यांनी शेतात आधुनिक पद्धतीचा वापर केला. त्यांनी सुरुवातीलाच ३५ क्विंटल कारल्याचे उत्पादन घेतले आहे. अजूनही ते कारल्याचे उत्पादन घेत असून कारले लागल्याच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत त्यांना २०० क्विंटल कारल्याचे उत्पादन होणे अपेक्षित आहे. यासाठी ते शेतात मोठी मेहनत घेत असतात. राजुरा तालुका कृषी अधिकारी जी.के. कडलग, कृषी पर्यवेक्षक टी.जी.आडे व कृषी सहाय्यक यांचे यासाठी त्यांना मार्गदर्शन लाभत आहे. एकीकडे शेतीला अवकळा आली असताना वरोडा येथील शेतकऱ्याने मोठ्या हिंमतीने प्रबळ इच्छाशक्ती आणि मेहनतीच्या बळावर फुलविलेली शेती नक्कीच हताश झालेल्या शेतकºयांना आशेचा नवा किरण ठरणार आहे.निसर्गाची अवकृपा, शासनाच्या शेतकरीविरोधी धोरणामुळे दिवसेंदिवस शेतीला अवकळा येत आहे. नापिकीमुळे शेतकरी कर्जबाजारी होत आहे. मात्र शेतकऱ्यानी हताश न होता आधुनिक पद्धतीने शेतीची कास धरली तर नक्कीच शेतीत भरघोस उत्पादन येईल. आजपर्यंत ३५ क्विंटल कारल्याचे उत्पादन घेतले असून पुन्हा २०० क्विंटलपर्यंत कारल्याचे उत्पादन होऊ शकते.-किशोर नांदेकरप्रगतशील शेतकरी, वरोडा.

टॅग्स :agricultureशेती