शहरं
Join us  
Trending Stories
1
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
2
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
3
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
4
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
5
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
6
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
7
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
8
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
9
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
10
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
11
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
12
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
13
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
14
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
15
Asha Bhosle: "...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
16
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
17
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
18
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
19
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
20
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
Daily Top 2Weekly Top 5

गडचांदूर ग्रामीण रुग्णालय रामभरोसे

By admin | Updated: March 8, 2016 00:42 IST

गडचांदूर रुग्णालय रामभरोसे असून पिण्याच्या पाण्याचीसुद्धा येथे कमतरता आहे.

रुग्णांना पिण्याचे पाणी नाही : दवाखानाच पडला आजारीगडचांदूर : गडचांदूर रुग्णालय रामभरोसे असून पिण्याच्या पाण्याचीसुद्धा येथे कमतरता आहे. रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना पिण्यासाठी बाहेरून पाणी आणावे लागत आहे. सरकारी दवाखान्यातील हे वास्तव रविवारी रात्री निदर्शनास आले.नजीकच्या बिबी येथील तुळशीराम बावणे (४६) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. तब्बेत अस्वस्थ वाटत असल्याने त्यांना चंद्रपूर येथील सामान्य रुग्णालयात उपचारासाठी नेले. मात्र तेथेच त्यांची प्राणज्योत मावळली. शवविच्छेदनासाठी उशीर होतो म्हणून गडचांदूर ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्याचा सल्ला तेथील डॉक्टरांनी दिल्याने त्यांचा मृतदेह गडचांदूर ग्रामीण रुग्णालयात आणला. रात्री २ वाजताच्या सुमारास गडचांदूर ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना व रुग्णांसोबत असलेल्या नातेवाईकांना बाहेरून पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी लागली. गडचांदूर येथील ग्रामीण रुग्णालयच आजारी पडल्याने याठिकाणी सर्वसामान्य रुग्णांचे हाल होत आहे. येथे डॉक्टरांचा उर्मटपणा रुग्णांना दिलासा न देता रक्तदाब वाढवणारा ठरतो. अनेकदा गडचांदूरातील पुढारी उपोषण व आंदोलने करतात. मात्र त्याचा रुग्णालयाच्या विकासात कसलाही फरक आतापर्यंत पडला नाही. जेथे रुग्णांना पिण्यासाठी पाणी नाही, त्या दवाखान्याची अवस्था काय असेल, हे सांगण्याची गरज नाही. गडचांदूर व जिवती परिसरातील रुग्णांसाठी आशेचा किरण म्हणून हा एकमेव दवाखाना आहे. मात्र या दवाखान्याकडून रुग्णांनी काय अशा करावी, हा प्रश्नच आहे. नगर परिषदेतील रुग्णालय समिती अनेकदा भेट देतात. मात्र कोणत्या समस्या जाणून घेतात, हे त्यांनाच ठाऊक आहे. राजकीय पक्षाचे नेते, कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्ते, नगराध्यक्ष, पदाधिकारी व रुग्णालय समिती डोळे बंद करून स्वत:ची पोळी शेकून घेण्यापुरतीच राहिल्याने सामान्य रुग्णांनी कोणाकडे धाव घ्यावी, हा प्रश्नच आहे. (शहर प्रतिनिधी)