शहरं
Join us  
Trending Stories
1
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
2
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
3
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
4
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
5
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
6
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
7
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
8
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
9
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
10
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
11
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
12
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
13
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
14
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
15
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
16
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
17
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
18
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
19
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
20
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

निधीअभावी रमाई योजना रखडली

By admin | Updated: July 22, 2014 23:56 IST

शासनाने अनुसूचित जाती व नवबौद्ध कुटुंबाचे जिवनमान उंचावावे व हक्काचा निवारा मिळावा म्हणून ग्रामीण व शहरी भागामध्ये दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांना समाजकल्याण विभागामार्फत रमाई घरकूल

देवाडा खुर्द : शासनाने अनुसूचित जाती व नवबौद्ध कुटुंबाचे जिवनमान उंचावावे व हक्काचा निवारा मिळावा म्हणून ग्रामीण व शहरी भागामध्ये दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांना समाजकल्याण विभागामार्फत रमाई घरकूल योजना सुरु केली. मात्र पोंभुर्णा पंचायत समितीमध्ये निधी प्राप्त न झाल्यामुळे सदर योजना रखडली आहे. त्यामुळे अनेकांचे घरकुलाचे स्वप्न भंगले आहे.ग्रामीण भागातील गोरगरीब नवबौद्धांचे जिवनमान उंचावे व त्यांच्या निवाऱ्याचा प्रश्न सुटावा यासाठी शासनाने समाजकल्याण विभागामार्फत सन २००८ पासून रमाई घरकुल योजना सुरु केली. सदर योजनेअंतर्गत पोंभुर्णा येथे ६० लाभार्थ्यांच्या घरकुलास मंजुरीसुद्धा दिली. परंतु घरकुलाचे काम सुरु करण्याविषयी लाभार्थ्यांनी ग्रामपंचायत कार्यालयात विचारणा केली असता आमच्याकडे काहीच नाही. पंचायत समितीकडे माहिती विचारा, असे सांगतात. तर याबाबत पंचायत समिती कार्यालयाकडे विचारणा केली असता संबंधित कर्मचारी उडवाउडवीचे उत्तर देत संबंधित योजनेचा निधीच आला नसल्याचे सांगत आहे. त्यामुळे तालुक्याचे ठिकाण असलेल्या ग्रामपंचायतीमध्ये सदर योजनेचे तीन-तेरा वाजले आहे. तालुक्याचे ठिकाण असलेल्या पोंभुर्णा येथे या योजनेची अशी अवस्था आहे तर, ग्रामीण भागात काय स्थिती असेल, असा प्रश्न परिसरातील नागरिकांमध्ये निर्माण झाला आहे. सदर योजनेंतर्गत दारिद्र्य रेषेखालील अनुसूचित जाती व नवबौद्ध कुटुंबांना ग्रामीण क्षेत्रामध्ये घराच्या बांधकामासाठी कमाल मर्यादा एक लाख रुपये आहे. शासनस्तरावर गोरगरीब नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी नानाविध योजना राबविल्या जात असल्या तरी, अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या उदासीनतेमुळे महत्त्वाच्या योजनांचा लाभ पाहिजे त्या प्रमाणातत लाभार्थ्यांना मिळत नसल्याचे चित्र आहे. मागील वर्षी अतिवृष्टीने तालुक्यासह संपूर्ण परिसरामध्ये मोठे नुकसान झाले. अनेक घरांची पडझड झाली. त्यामुळे बरेच नागरिक पडक्या घरात वास्तव्य करीत आहेत. आज ना उद्या घरकूल योजनेचा लाभ मिळेल, या विवंचनेत असणाऱ्या या गरीब नवबौद्ध लाभार्थ्यांना निवाऱ्याचे स्वप्न दिवास्वप्न ठरणार की, काय असा प्रश्न उपस्थित होत आहे. संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देऊन लाभार्थ्यांना घरकूल योजनेच लाभ मिळवून द्यावा व समाजकल्याण विभागाने निधी उपलब्धता करुन द्यावी अशी मागणी अशोक गेडाम यांनी केली आहे. (वार्ताहर)