शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
6
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
7
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
8
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
9
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
10
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
11
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
12
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
13
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
14
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
15
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
16
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
17
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
18
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
19
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
20
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
Daily Top 2Weekly Top 5

राजुरा नगरपरिषदेतील अधिकारी गायब

By admin | Updated: October 24, 2016 00:55 IST

राजुरा नगरपालिकेबाबत वारंवार नागरिकांच्या तक्रारी वाढू लागल्या आहेत.

स्वच्छतेचे तीन तेरा : ट्री गार्ड स्लॅबवर अस्ताव्यस्त पडलेले बी. यू. बोर्डेवार राजुराराजुरा नगरपालिकेबाबत वारंवार नागरिकांच्या तक्रारी वाढू लागल्या आहेत. या पार्श्वभूमीवर लोकमतने शुक्रवारी नगरपरिषद राजुरा येथे दुपारी फेरफटका मारला असता एकही अधिकारी आढळून आला नाही. नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांचे दालन खुले होते. अधिकारी नव्हते, त्यांच्या बाजूला असलेले नगर परिषदेचे अधीक्षक यांचे दालनही रिकामे होते. पाणी पुरवठा विभाग, बांधकाम विभाग यात कुठलाही अधिकारी आढळून आला नाही. पाणी पुरवठा विभागाच्या बाजूला भिंतीवर गुटखा खाऊन थुंकल्याची घाण होती. स्वच्छतेसाठी पुरस्कार मिळविणाऱ्या नगर परिषद राजुराच्या कार्यालयात अस्वच्छता आढळून आली. थोडे वरच्या बाजूला गेले असता पाण्याची टाकी वर्षभरापासून स्वच्छ केली नसल्याचे आढळून आले. पाण्याच्या टाकीला झाकण नव्हते. वृक्ष संवर्धनासाठी आणलेले ट्री गार्ड स्लॅबवर अस्ताव्यस्त फेकून आढळले. हाच वृक्ष संवर्धाचा प्रकार आहे काय, असा प्रश्न यानिमित्ताने निर्माण झाला आहे. शासनाच्या वृक्ष संवर्धनाची एैशीतैसी होत असल्याचे राजुरा नगर पालिकेत आढळून आले. स्लॅबवर अस्ताव्यस्त पडलेले प्लॉस्टिकच्या साहित्यामुळे कचरा नष्ट करण्याऐवजी स्लॅबवर टाकून ठेवण्याचा प्रकार पहिल्यांदाच बघायला मिळाला. पाण्याच्या टाकीच्या भोवताल स्लॅबवर कचरा उगवलेला दिसला. राजुरा नगर पालिका स्वच्छतेच्या मोठ्या बाता करतात. मात्र या नगर पालिकेचे अधिकारी यांचे कुठल्याच प्रकारचे कर्मचाऱ्यांवर नियंत्रण नसल्यामुळे स्वच्छता अभियानाचे तीनतेरा वाजले आहे.एकीकडे भारताचे पंतप्रधान स्वच्छता मोहीम राबवित असताना राजुरा नगर पालिका कार्यालयात मात्र दोन ट्रक कचरा वेस्ट मटेरीयल निघेल, एवढा साचून ठेवलेला आढळून आला.