शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

मुद्रा बँक योजनेची जनजागृती करा

By admin | Updated: August 24, 2016 00:34 IST

सुशिक्षित बेरोजगांरासह उद्योजक होण्याची आशा बाळगून असलेल्या हजारो व्यक्तींच्या हाताला हक्काचा स्वयंरोजगार ...

आशुतोष सलील : मुद्रा बँक समन्वय समितीची बैठकचंद्रपूर : सुशिक्षित बेरोजगांरासह उद्योजक होण्याची आशा बाळगून असलेल्या हजारो व्यक्तींच्या हाताला हक्काचा स्वयंरोजगार उपलब्ध करुन देण्यासाठी मुद्रा बँक योजना सुरु करण्यात आली आहे. या बँकेचा अधिकाधिक युवकांना फायदा होण्यासाठी या योजनेची व्यापक जनजागृती करा, असे निर्देश जिल्हाधिकारी आशुतोष सलील यांनी दिले.जिल्हास्तरीय मुद्रा बँक योजना समन्वय समितीची पहिली बैठक जिल्हाधिका-यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली, त्यावेळी ते बोलत. बैठकीला जिल्हाधिकाऱ्यासह जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक चेतन पाटील, जिल्हा नियोजन अधिकारी जी.आर.वायाळ, जिल्हा माहिती अधिकारी मंगेश वरकड, जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी जुनोनकर, अग्रणी बँकेचे रामटेके व जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे सहाय्यक प्रकल्प अधिकारी प्रमोद घटे आदी उपस्थित होते.युवकांना कर्जाच्या माध्यमातून स्वयंरोजगार उपलब्ध करुन देण्यासाठी पंतप्रधानांनी मुद्रा बँक योजना सुरु केली आहे. या योजनेअंतर्गत व्यवसायासाठी कर्ज उपलब्ध करुन दिले जाते. सर्व राष्ट्रीयकृत बॅकांच्यावतीने कर्जाची सुविधा उपलब्ध आहे. या योजनेचा जास्तीत जास्त प्रचार करुन अधिकाधिक युवकांपर्यंत योजना पोहचविणे आवश्यक आहे. त्यासाठी जनजागृतीवर करुन जनसामान्यापर्यंत ही योजना पोहचविण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.उद्योजक होवू इच्छिणाऱ्या युवकांसाठी मेळावे, चर्चा सत्र घेण्याची सुचना त्यांनी यावेळी केली. यासोबतच औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत प्रशिक्षण घेणारे तसेच प्रशिक्षण घेवून बाहेर पडलेल्या उमेदवारांसाठीही प्रशिक्षण आयोजित करण्याची सुचना त्यांनी केली. यशस्वी उद्योजक म्हणून कारकिर्द घडविलेल्या उद्योजकांच्या यशोगाथा व त्यांचे मार्गदर्शन वर्ग आयोजित करण्याचा सल्ला दिला. (प्रतिनिधी)