शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
2
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
3
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
4
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
5
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
6
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
7
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
8
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
9
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
10
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
11
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
12
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
13
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
14
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
15
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
16
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
17
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
18
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
19
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
20
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
Daily Top 2Weekly Top 5

चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्राला पावसाचा फटका

By admin | Updated: September 9, 2014 23:21 IST

मान्सूनच्या अखेरच्या टप्प्यातील पावसाने चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्राला झटका दिला आहे. गेल्या दोन दिवसातील पावसाने येथील उत्पादन खालावले असून ते ३५० मेगावॅटवर घसरले आहे.

वीज संकट : उत्पादन ३५० मेगावॅटवर खालावलेचंद्रपूर : मान्सूनच्या अखेरच्या टप्प्यातील पावसाने चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्राला झटका दिला आहे. गेल्या दोन दिवसातील पावसाने येथील उत्पादन खालावले असून ते ३५० मेगावॅटवर घसरले आहे.या विद्युत केंद्राची निर्मितीक्षमता २ हजार ३४० मेगावॅटची आहे. गेल्या दोन दिवसात झालेल्या पावसाने आणि विजेच्या कडकडाटामुळे ५०० मेगावॅट क्षमतेच्या सहाव्या क्रमांकाच्या संचात बिघाड निर्माण झाला. यामुळे उत्पादन ठप्प झाले आहे. ५०० मेगावॅट क्षमतेच्या सातव्या क्रमांकाच्या संचात व्हायब्रेशन सुरू झाल्याने हा संचही बंद करण्यात आला आहे. २१० मेगावॅट क्षमतेच्या तिसऱ्या क्रमांकाच्या संचाचा बॉयलर ट्यूूब लिकेज झाल्याने हा संचही बंद पडलेला आहे. तर, २१० क्षमतेचा संच क्रमांक एक नियमित देखभालीच्या कारणासाठी बंद आहे. आज ५०० मेगावॅट क्षमतेचा पाचव्या क्रमांकाचा संचही काही काळासाठी बंद ठेवण्यात आला होता. या संदर्भात सीएसटीपीएसचे जनसंपर्क अधिकारी विष्णु ढगे यांना विचारणा केली असता ते म्हणाले, बंद करण्यात आलेले युनिट तीन तासात सुरू करण्यात आले. सातव्या क्रमांकाच्या संचाच्या दुरूस्तीसाठी नागपुरातून तंत्रज्ज्ञांची चमू बोलाविण्यात आली होती. सध्या एक, तीन आणि पाच या क्रमांकाचे तीन संच तांत्रिक कारणामुळे बंद आहेत. त्यामुळे उत्पादन खालावले आहे. (जिल्हा प्रतिनिधी)