शहरं
Join us  
Trending Stories
1
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
2
लग्नाहून परतताना मृत्यूनं कवटाळलं, हापूड जिल्ह्यात वऱ्हाड्यांच्या बसला भीषण अपघात, ६ जण ठार!
3
डोनाल्ड ट्रम्प यांची होर्मुजच्या सामुद्रधुनीवर बंदी घालण्याची धमकी, Crude Oil च्या किमतीचा भडका, किती झाली किंमत?
4
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
5
निरोपाची वेळ आली..! आशा भोसले यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार होणार, दुपारी तीन वाजेपर्यंत अंत्यदर्शन
6
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
7
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
8
उरले उरात काही 'आवाज' चांदण्यांचे, आशा भोसले यांचे निधन, आज होणार अंत्यसंस्कार
9
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
10
विदर्भात पारा ५ अंशांनी वाढला; अकोला जिल्हा सर्वाधिक ‘हॉट’, थंड हवेचे ठिकाण बुलढाणाही तापले; ८ दिवस राहणार तडाखा
11
MI vs RCB : विकेट गमावल्यावर Virat Kohli ला राग अनावर! हेल्मेट-ग्लोव्हज फेकल्याचा व्हिडिओ व्हायरल
12
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
13
‘पीएच.डी गाइड’च्या छळाला कंटाळून पुण्यात विद्यार्थिनीनं संपवलं जीवन, मार्गदर्शक शास्त्रज्ञ अटकेत; चिठ्ठीतून गंभीर आरोप
14
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
15
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
16
अमरनाथ यात्रा ३ जुलैला सुरू होणार; १५ एप्रिलपासून नोंदणी
17
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
18
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
19
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
20
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

कोरपना येथे रेल्वे मार्ग तयार करावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2021 04:32 IST

शेतकरी पुन्हा संकटात सिंदेवाही : कधी ओला दुष्काळ, तर कधी कोरडा दुष्काळ, धानाला योग्य भाव नाही, त्यामुळे कर्जबाजारीपणा वाढत ...

शेतकरी पुन्हा संकटात

सिंदेवाही : कधी ओला दुष्काळ, तर कधी कोरडा दुष्काळ, धानाला योग्य भाव नाही, त्यामुळे कर्जबाजारीपणा वाढत आहे. सततच्या नापिकीमुळे शेतकऱ्यांनी जे कर्ज घेतले, त्यांची फरतफेड करणे कठीण झाले आहे. परिणामी दिवसेंदिवस कर्जाचा बोझा वाढत. यावर्षी धान उत्पादनही कमी झाले असून, त्यांनी पुन्हा शेतकरी संकटात सापडले आहे.

जिवती तालुक्यात विजेचा लपंडाव

जिवती : तालुक्याील पाटण परिसरात गेल्या काही दिवसांपासून विजेचा लपंडाव सुरू आहे. त्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. विजेअभावी नागरिकांचे हाल होत आहे. महावितरण कंपनीने याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.

दाताळा मार्गावर गस्त वाढवावी

चंद्रपूर : दाताळा गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर मजनूंचा सुळसुळाट असतो. यामुळे परिसरातील नागरिकांना त्रास होत आहे. पोलिसांनी याकडे लक्ष देऊन मजनूंना समज द्यावी, अशी मागणी होत आहे. प्रेमीयुगुल निर्जनस्थळी जात असल्याने एखादी मोठी दुर्घटना घडण्याची शक्यताही नाकारता येत नाही.

जड वाहतुकीवर बंदी घालण्याची मागणी

बल्लारपूर : बल्लारपूर तालुक्यात रात्रीच्या सुमारास मोठ्या प्रमाणात जड वाहतूक सुरू असते. हा प्रकार जिल्ह्यातील काही भागात सर्रास सुरू असून, जड वाहतुकीमुळे रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. याशिवाय सध्या बांधकाम मोठ्या प्रमाणात सुरू आहे. त्यामुळे ओव्हरलोड वाहतूक करीत असल्याने याचा फटका रस्त्यांना बसत आहे.