शहरं
Join us  
Trending Stories
1
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
2
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
3
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
4
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
5
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
6
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
7
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
8
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
9
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
10
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
11
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
12
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
13
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
14
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
15
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
16
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
17
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
18
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
19
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
20
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
Daily Top 2Weekly Top 5

राजुरा-आसिफाबाद रोडवरील रेल्वे गेट विद्यार्थी व नागरिकांसाठी डोकेदुखी ठरत आहे.

By admin | Updated: January 7, 2016 01:35 IST

दाद द्यायलाही मन असावे लागते. ते ब्रह्मपुरीकरांच्या ठिकाणी आहे. आणि म्हणूनच या ब्रह्मपुरीकरांनी ब्रह्मपुरी येथे आयोजित ब्रह्मपुरी महोत्सवात झालेल्या ...

घनश्याम नवघडे  राष्ट्रसंत तुकडोजी महाराज परिसर (ब्रह्मपुरी)दाद द्यायलाही मन असावे लागते. ते ब्रह्मपुरीकरांच्या ठिकाणी आहे. आणि म्हणूनच या ब्रह्मपुरीकरांनी ब्रह्मपुरी येथे आयोजित ब्रह्मपुरी महोत्सवात झालेल्या प्रत्येक उपक्रमाला दाद देऊन आयोजकांचा उत्साह वाढविला. तो खरोखरच वाखाणण्याजोगा आहे.शनिवारी २ तारखेला या महोत्सवाचा आरंभ झाला. नगर स्वच्छता अभियानाने सुरूवात झालेल्या या महोत्सवात सायंकाळी निघालेल्या शोभायात्रेने खऱ्या अर्थाने रंग भरला वा शोभायात्रेला आणि नंतर उद्घाटकीय कार्यक्रमाला लोकांनी दिलेला प्रतिसाद पाहिला तर अख्खी ब्रह्मपुरी नगरी लोकनगरी झाल्याचे भासत होते.या महोत्सवात अनेक उपक्रम समाविष्ट होते. कृषी व व्यापार प्रदर्शनी, आरोग्य तपासणी शिबिर, कृषी मेळावा, सरपंचांचा सत्कार, महिला मेळावा, होम मिनिस्टर स्पर्धा आदी विविध उपक्रमांचा यात समावेश आहे.या सर्वच उपक्रमांना ब्रह्मपुरीकरांनी भरभरून दाद दिली. यात कोणतीही शंका नाही. पण शिर्डीचे साईबाबा आणि ‘तथागत’ या महानाट्यांना दिलेला प्रतिसाद न भुतो न भविष्यती असाच म्हणावा लागेल. प्रतिसाद कशाला म्हणतात, ते या दिवशी ब्रह्मपुरीकरांनी खऱ्या अर्थाने दाखवून दिले.मंगळवारी झालेल्या समारोपीय कार्यक्रमाबद्दल असेच म्हणता येईल. या दिवशी सायंकाळी मिस ब्रह्मपुरी आणि मिसेस ब्रह्मपुरी या कार्यक्रमाला प्रेक्षकांचा उदंड असा प्रतिसाद होताच. पण या कार्यक्रमानंतर होणाऱ्या समारोपीय कार्यक्रमास जी उपस्थिती होती, तीसुद्धा लक्षणीय होती. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज परिसरात मिस ब्रह्मपुरी आणि मिसेस ब्रह्मपुरी हा कार्यक्रम सुरू असताना हजारो प्रेक्षक या कार्यक्रमाचा आस्वाद घेत होते. त्याच वेळी सदर प्रतिनिधीने ब्रह्मपुरी येथील डेपो रोड, वडसा रोड, आनंद टॉकीज रोड या रस्त्यांनी फेरफटका मारला असता लोकांचे जत्थेचे जत्थे कार्यक्रम स्थळाकडे जाताना दिसत होते.