शहरं
Join us  
Trending Stories
1
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
2
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
3
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
4
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
5
होर्मुझमध्ये अमेरिकेचा 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
6
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
7
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
8
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
9
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
10
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
11
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
12
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
13
बंद घराची कौले काढून चोरी; दहा तोळे सोने व १७ हजारांची रोकड लंपास!
14
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
15
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
16
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
17
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
18
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
19
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
20
अमेरिका-इराण चर्चा निष्फळ! पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया आली समोर; परराष्ट्र मंत्री इशाक डार म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

लोंढोलीत दारूतस्कराच्या घरावर छापा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2021 04:28 IST

एलसीबीची कारवाई : दोन लाख ६४ हजारांचा मुद्देमाल जप्त चंद्रपूर : घरात दारूची साठवणूक करून अवैधरित्या विक्री करीत असल्याची ...

एलसीबीची कारवाई : दोन लाख ६४ हजारांचा मुद्देमाल जप्त

चंद्रपूर : घरात दारूची साठवणूक करून अवैधरित्या विक्री करीत असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकून दोन लाख ६४ हजार रुपये किमतीचा दारूसाठा जप्त केला. ही कारवाई सावली तालुक्यातील लोंढोली येथे केली.

यावेळी श्रीनिवास रामदास पुल्लूरवार याला अटक करून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलीस अधीक्षक अरविंद साळवे यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांनी जिल्ह्यात अवैध दारू तस्करांविरुद्ध विशेष मोहीम सुरू केली आहे. संचारबंदीच्या काळात परप्रांतातून दारूतस्करी होण्याची शक्यता ओळखून एलसीबीचे विविध पथके जिल्ह्यात गस्त घालत आहेत. सावली तालुक्यातील लोंढोली येथील श्रीनिवास पुल्लूरवार यांनी घरात दारूची साठवणूक करून ठेवली असल्याची माहिती पथकाला मिळाली.

त्यानंतर पोलीस हवालदार नितीन साळवे, प्रकाश बलकी, सुभाष गोहोकार, मिलिंद जांभुळे यांच्या पथकाने पुल्लूरवार याच्या घरी छापा टाकला. यावेळी घरातून दोन लाख ६४ हजार रुपये किमतीचा विदेशी दारूसाठा आढळून आला. पोलिसांनी मुद्देमाल जप्त करून श्रीनिवास पुल्लूरवार याला अटक केली. त्याच्याविरुद्ध सावली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.