शहरं
Join us  
Trending Stories
1
आमदाराचे बनावट लेटरहेड, सही वापरून ३ काेटींचा निधी पळवला
2
गरीब अन् मध्यमवर्गीयांना दिलासा; ‘जीएसटी’त बदलाचा केंद्राचा विचार; आवश्यक वस्तूंवरील १२% कर रद्द करण्याची शक्यता
3
‘घड्याळ’बाबत जसा आदेश, तसाच ‘धनुष्यबाण’बाबतही द्या; उद्धवसेना सुप्रीम कोर्टात; १४ जुलै रोजी सुनावणी
4
ठाकरे - भाऊबंदकी ते भावबंधन; मागचे सर्व विसरून नवीन सुरुवात करावी लागेल
5
शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून विधानसभेत रणकंदन, विरोधकांनी सरकारला धरले धारेवर; तत्काळ चर्चेची मागणी फेटाळली
6
मनसे-उद्धवसेनेकडून मेळावा स्थळाची पाहणी; सर्वच राजकीय नेत्यांना आमंत्रण
7
१.३५ लाख कोटींचे गुंतवणूक प्रस्ताव मंजूर; १ लाख रोजगारनिर्मिती होणार
8
वाहतूकदारांचा संप सुरूच, परिवहनमंत्र्यांसोबतच्या बैठकीत तोडगा निघाला नाही
9
त्यांचा २,००० कोटींच्या मालमत्तेवर हाेता डाेळा; साेनिया, राहुल गांधींनी कट रचल्याचा ईडीचा आरोप
10
लिंगाची पुनर्रचना करून रुग्णाला दिले नवे आयुष्य; नागपुरात मध्य भारतातील पहिल्या शस्त्रक्रियेचा दावा
11
काेराेना लस अन् हृदयविकाराचा संबंध नाही; जीवनशैली, आनुवंशिक दाेष हेच कारणीभूत
12
गळके छत, ओल्या भिंती... सांगा आता शिकायचं कसं; अंबरनाथ नगरपालिकेच्या शाळेची दुरवस्था; विद्यार्थ्यांचे हाल
13
कल्याणमधील पाणीपुरी विकणाऱ्याच्या मुलाने मारली ‘आयआयटी’पर्यंत मजल; रुरकी येथील आयआयटीत मिळाला प्रवेश
14
पदवी प्रमाणपत्रावर ‘मुंबई’चे स्पेलिंग चुकले; कंत्राटदाराला ठेक्याच्या २०% दंड; मुंबई विद्यापीठाच्या समितीच्या अहवालानंतर कारवाई
15
परिवहन मंत्र्यांनीच पकडली रॅपिडो बाइक टॅक्सी; ॲप नसल्याची परिवहन विभागाकडून खोटी माहिती
16
विदेशी विद्यापीठांचा उपयोग ‘इंडिया’ला होईल की ‘भारता’ला?
17
शशी थरूर, आप खुश तो बहोत होंगे!
18
मायक्रोसॉफ्टमध्ये मोठी कपात होणार! ९००० हून अधिक कर्मचाऱ्यांना फटका बसणार?
19
यशस्वी जैस्वालची सेंच्युरी हुकली! पण एका डावात अनेक विक्रम; हिटमॅन रोहित शर्मालाही टाकले मागे
20
खतरनाक इनस्विंग! स्टायलिश अंदाजात बॉल सोडला अन् 'क्लीन बोल्ड' होऊन तंबूत परतला (VIDEO)

उड्डाण पुलाचा प्रश्न ऐरणीवर

By admin | Updated: November 2, 2015 01:00 IST

दीर्घकळापासून प्रलंबित असलेल्या चंद्रपूर शहरातील बाबूपेठ उड्डाण पुलाला केंद्र आणि राज्य सरकारची मंजुरी मिळाली असली तरी

६९ कुुटुंबीयांचा विरोध : दीड लाख लोकांना वेठीस धरण्याचा प्रयत्नचंद्रपूर : दीर्घकळापासून प्रलंबित असलेल्या चंद्रपूर शहरातील बाबूपेठ उड्डाण पुलाला केंद्र आणि राज्य सरकारची मंजुरी मिळाली असली तरी या पुलामुळे बाधित होणार असलेल्या नझूलच्या जागेवरील ६९ कुटुंबीयांनी विरोध केला आहे. यामुळे जवळपास दीड लाख लोकांना वेठीस धरत उड्डाणपुलाचे काम लांबणीवर टाकण्यात आले आहे.वरोरा नाका चौकात चुकीचे नियोजन करून पुलाचे बांधकाम करण्यात आल्यामुळे ५० हून अधिक लोकांचे बळी गेले. या चौकातील काही हितसंबंधीयांच्या मालकी हक्काच्या जमिनींना बाधा पोहोचू नये म्हणून राजकीय नेत्यांनी हे बळी घेतले. आता उड्डाण पुलाच्या विस्तारीकरणाचे काम सुरू आहे. त्याचेसुद्धा डिझाईन चुकले. त्यामुळे नव्याने नकाशा तयार करून काम सुरू आहे. वरोरा नाका उड्डाण पुलाच्या चुकीच्या नियोजनाच्या पार्श्वभूमीवर बाबूपेठ उड्डाण पुलाच्या कामात राजकीय अडसर निर्माण झाल्याची माहिती आता पुढे आली आहे. केंद्र सरकारच्या बजेटमध्ये बाबूपेठ उड्डाण पुलाला मंजुरी प्रदान करण्यात आली आहे. तीन महिन्यांपूर्वी नागपुरात झालेल्या एका बैठकीत रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी बाबूपेठ उड्डाण पुलाच्या नकाशाला मंजुरी दिली. मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाने यातील त्रुटी अजूनही दुरूस्त केलेल्या नाही. रेल्वे उड्डाण पुलाचे काम रेल्वे प्रशासनाच्या देखरेखीखाली होणार असले तरी अप्रोचचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाकडे आहे.प्रस्तावित बाबूपेठ उड्डाण पुलामुळे नझूलच्या जागेवर असलेल्या ६९ घरांना बाधा पोहोचणार आहे. त्यामुळे या घरमालकांनी उड्डाण पुलाला प्रचंड विरोध दर्शविला आहे. बाधा पोहोचणार असलेल्या लोकांचे म्हणणे ऐकून घेणाऱ्या राजकीय नेत्यांनीसुद्धा आता या लोकांची बाजू घेणे सुरू केले आहे. विकासकामे करताना लोकांची मने दुखवायची कशाला, अशी भूमिका घेत काही राजकीय नेत्यांनी यातून मार्ग काढण्यासाठी बाबूपेठ उड्डाण पुलाचा प्रश्न प्रलंबित ठेवला आहे. वास्तविक नझूलच्या जागेवरील अतिक्रमण निघाले तर या पुलाचा प्रश्नच मार्गी लागू शकतो. मात्र केवळ ६९ कुटुंबांची विवंचना करणाऱ्या राजकीय नेत्यांना दीड लाख लोकांचा विसर पडला कसा, असा प्रश्न यानिमित्त उपस्थित केला जात आहे. बागला चौकातून बाबूपेठकडे रोज येणाऱ्या-जाणाऱ्यांची संख्या मोठी आहे. या मार्गावर असलेल्या रेल्वेरूळावरून सुपरफास्ट ट्रेन धावत असतात. २४ तासातून १८ ते २० वेळा या मार्गावरचे फाटक बंद करावे लागते. त्यामुळे येणाऱ्या-जाणाऱ्यांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. प्रत्येक वेळी ८ ते १० मिनिटे फाटक बंद असते. त्यामुळे गंभीर रुग्णांनासुद्धा फाटक सुरू होईपर्यंत ताटकळत राहावे लागते.या मार्गावर उड्डाण पूल व्हावे, अशी जुनी मागणी आहे. ही मागणी आता मान्य झाली असताना पुलाचे बांधकाम लांबणीवर टाकण्याचा प्रयत्न सुरू आहे. या वादावर अद्याप कोणताही मार्ग निघाला नसल्याने उड्डाण पुलाच्या टेंडर प्रोसेसचे काम थांबले आहे. त्यामुळे या उड्डाण पुलाचे काम नेमके केव्हा सुरू होईल, हे सध्यातरी सांगणे कठीण असल्याचे एकंदरीत चित्र आहे. (शहर प्रतिनिधी)