शहरं
Join us  
Trending Stories
1
लक्ष्मणरेषा ओलांडाल तर तुमचा विनाश अटळ, समूळ उच्चाटन करू; PM मोदींचा पुन्हा खणखणीत इशारा
2
काश्मीरचा बळकावलेला भूभाग पाकने परत करावा; भारताची आग्रही मागणी, कोणाची मध्यस्थी मान्य नाही
3
दहशतवादी मसूद अजहरच्या कुटुंबीयांना पाकिस्तान देणार १४ कोटी; विशेष 'शुहाद पॅकेज'ची घोषणा
4
डॉ. विजय दर्डा, आपला अमृतमहोत्सव शुभंकर असो...; PM नरेंद्र मोदी यांचा विशेष शुभेच्छा संदेश
5
राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंपासून दूर ठेवण्याचे प्रयत्न? शिंदे गटाकडून हालचाली, चर्चांना उधाण
6
तयार होतेय 'शक्ती' चक्रीवादळ, देशभर तीन दिवस जोरदार पाऊस; पावसाची कधी आणि कुठे शक्यता?
7
लष्कराने दहशतवादी तळ नेमके शोधले तरी कसे? या शस्त्रांमुळे पाकला दयेची मागावी लागली भीक
8
ऑपरेशन सिंदूर: 'त्या' १२ दहशतवादी तळांवर कारवाईसाठी पाकवर दबाव; २१ तळांची होती भारताची यादी
9
काश्मिरात लष्कर-ए-तैयबाच्या म्होरक्यासह ३ दहशतवाद्यांचा खात्मा
10
निवृत्तीनंतर कोणतेही सरकारी पद घेणार नाहीत सरन्यायाधीश खन्ना; भूषण गवई आज पदभार स्वीकारणार
11
"कामगारच विकासाचे खरे शिल्पकार"; राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचे प्रतिपादन
12
राज्याला रेल्वे फाटकमुक्त करणार: मुख्यमंत्री; नागपुरातील १० पुलांचेही लवकरच होणार उद्घाटन
13
उद्धवसेनेच्या माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर भाजपच्या वाटेवर? ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
14
दहावीतही मुलींचा 'स्ट्राइक रेट' जबरदस्त! सीबीएसईतही कन्या 'शक्ती'
15
साईभक्तांना देणगीनुसार विशेष प्राधान्य; श्री साईबाबा संस्थानचे सुधारित सुविधा धोरण
16
पश्चिम-मध्य रेल्वेच्या नव्या मार्गांच्या कामाला गती; २९.३२ हेक्टरवरची झाडे तोडण्यास परवानगी
17
“...तर लाखो लोक संघर्षाचे बळी ठरले असते”; डोनाल्ड ट्रम्प पुन्हा भारत-पाक युद्धविरामावर बोलले
18
“२४ तासांत देश सोडा”; भारताने केली पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यावर कठोर कारवाई
19
शेख हसीना यांच्या पक्षावर बंदी; बांगलादेशच्या निर्णयावर भारताची नाराजी, स्पष्ट केली भूमिका
20
Mumbai: मुंबईत पुन्हा मराठी- हिंदी वाद! जोपड्याचं डिलिव्हरी बॉयसोबत संतापजनक कृत्य

५० वर्षांनंतर मिळणार शुद्ध पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2018 22:31 IST

१९५६ साली नवानगर गावाचे पुनर्वसन होऊन एक नवीन गाव उदयास आले. तेव्हापासून गावातील नागरिक फ्लोराइडयुक्त पाण्यावरच आपली तहान भागवित होते. पण आता तिथे वॉटर एटीएम मंजूर झाले आहे. त्यामुळे या एटीएमच्या माध्यमातून त्यांना शुद्ध पाणी मिळणार आहे.

ठळक मुद्देपुनर्वसित नवानगर येथे वॉटर एटीएम मंजूर : नागरिकांना आरोग्य समस्येपासून मिळणार मुक्ती

घनश्याम नवघडे।लोकमत न्यूज नेटवर्कनागभीड : १९५६ साली नवानगर गावाचे पुनर्वसन होऊन एक नवीन गाव उदयास आले. तेव्हापासून गावातील नागरिक फ्लोराइडयुक्त पाण्यावरच आपली तहान भागवित होते. पण आता तिथे वॉटर एटीएम मंजूर झाले आहे. त्यामुळे या एटीएमच्या माध्यमातून त्यांना शुद्ध पाणी मिळणार आहे.नागभीड तालुक्यातील बोंड या ग्रामपंचायतीत नवानगर समाविष्ट आहे. १९५६ साली ब्रह्मपुरी तालुक्यातील बेटाळा या गावचे या ठिकाणी पुनर्वसन करण्यात आले आणि नवानगर हे गाव उदयास आले. पुनर्वसन काळात ३१ कुटुंबांना वनविभागाने घरे आणि शेतीसाठी जागा उपलब्ध करून दिली. आता गावाचा विस्तार बराच झाला आहे. आणि गावाची लोकसंख्याही चारशेवर पोचली आहे. मात्र हे गाव पूर्णपणे जंगलात वसले आहे. परिणामी गावातील पाण्याचे स्रोत्र फ्लोराईडयुक्त आहेत. त्यामुळे गावातील अनेक लोक या पाण्याच्या आजाराचे बळी ठरले आहेत. दात पिवळी पडणे, ते वेडीवाकडी होणे, हातपाय दुखणे, सांधेदुखीचा त्रास या आजारांचा यात समावेश आहे.प्रारंभी लोकांना पुरेसे ज्ञान नव्हते त्यामुळे त्यांनी या गंभीर समस्येकडे दुर्लक्ष केले. पण जेव्हा या पाण्याच्या दुष्परिणामाविषयी कळू लागले तेव्हा या पाण्यापासून आमची मुक्तता करा, अशी एकमुखी मागणी ते करू लागले. २००५ पासून ते या मागणीचा पाठपुरावा करीत होते. पण या मागणीची एकाही लोकप्रतिनिधीने व अधिकाऱ्याने या मागणीचा व समस्येचा गांभीर्याने विचार केला नाही. दरम्यान या भागाचे जि. प. सदस्य संजय गजपुरे यांच्या माध्यमातून त्यांनी पुन्हा ही मागणी रेटून धरली. आणि अखेर त्यांच्या या मागणीला यश आले असून शुद्ध पाण्याचे वॉटर एटीएम लावण्याचे कामही सुरू झाले आहे. तसेच राष्ट्रीय पेयजल योजनेतून पाणी पुरवठा योजनाही मंजूर होण्याच्या मार्गावर आहे.‘लोकमत’ने वेधले लक्षनवानगर या पूनर्वसन गावाच्या पाण्याच्या समस्येकडे लोकमतने अनेकदा वृृत्त प्रकाशीत करुन लक्ष वेधले होते. त्यामुळे आरोग्य यंत्राणा खळबळू जागी झाली. दरम्यान गावात वॉटर एटीएम मंजूर होऊन त्यांचे काम सुरु झाल्याने गावकºयांनी ‘लोकमत’चे आभार मानले आहे.