शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
6
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
7
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
8
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
9
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
10
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
11
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
12
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
13
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
14
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
15
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
16
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
17
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
18
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
19
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
20
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
Daily Top 2Weekly Top 5

लोकसेवा आणि विकास संस्थेचे पुरस्कार प्रदान

By admin | Updated: January 23, 2015 00:35 IST

दरवर्षी प्रमाणे यंदाही येथील लोकसेवा आणि विकास संस्थेच्यावतीने पुरस्कार प्रदान करण्यात आला.

चंद्रपूर: दरवर्षी प्रमाणे यंदाही येथील लोकसेवा आणि विकास संस्थेच्यावतीने पुरस्कार प्रदान करण्यात आला.डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख स्मृती पुरस्कार माजी मंत्री प्रा. वसंत पुरके, कस्तुरबा गांधी स्मृती पुरस्कार आमदार शोभाताई फडणवीस, वीर बाबूराव शेडमाके स्मृती पुरस्कार मोहन हिराबाई हिरालाल, माजी आमदार स्व. बाबूराव पोटदुखे स्मृती विशेष पुरस्कार माजी आमदार अ‍ॅड. वामनराव चटप यांना केंद्रीय रसायन व खते राज्यमंत्री हंसराज अहीर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ व रोख ११ हजार रुपये असे पुरस्काराचे स्वरूप आहे.येथील सरदार पटेल महाविद्यालयाच्या शांताराम पोटदुखे सभागृहात पार पडलेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी केंद्रीय अर्थराज्यमंत्री तथा लोकसेवा आणि विकास संस्थेचे अध्यक्ष शांताराम पोटदुखे होते. यावेळी सर्वोदय शिक्षण मंडळाचे अरविंद सावकार पोरेड्डीवार, गोंडवाना विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरु डॉ. किर्तीवर्धन दीक्षित, शफीक अहमद, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जे. ए. शेख यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी बोलताना प्रा. वसंत पुरके म्हणाले, या पुरस्काराने मी भारावून गेलो आहे. माझ्या राजकीय जडणघडीत शांताराम पोटदुखे यांचे योगदान मोठे आहे. विदर्भात शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत, ही दुर्दैवी बाब असून शेतकऱ्यांशिवाय आपला विकास शक्य नसल्याचे त्यांनी नमूद केले. यावेळी शोभाताई फडणवीस, अ‍ॅड. वामनराव चटप, मोहन हिराबाई हिरालाल यांनीही मनोगत व्यक्त केले. पुरस्कारप्राप्त सर्व मान्यवरांचे कार्य मोठे असून समाजासाठी त्याचे योगदान स्मरणात राहील असे, ना.हंसराज अहीर म्हणाले. शांताराम पोटदुखे म्हणाले, चळवळीतील कार्यकर्ते भरभरुन पोटतिडकीने कसे बोलतात, हे बघितले. समाजातील चांगली माणसे अर्ज करणार नाहीत, अशी धारणा असल्याने संस्था कधीच पुरस्कारासाठी अर्ज मागवित नसल्याचे स्पष्ट केले.प्रास्ताविकातून प्राचार्य डॉ. जे. ए.शेख, संचालन डॉ. राजलक्ष्मी रणराग कुळकर्णी तर आभार प्रा. स्वप्निल माधमशेट्टीवार यानी मानले. कार्यक्रमाला शहरातील प्रतिष्ठित नागरिक, प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)