शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
6
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
7
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
8
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
9
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
10
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
11
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
12
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
13
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
14
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
15
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
16
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
17
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
18
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
19
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
20
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
Daily Top 2Weekly Top 5

आचार संहितेत वनोपजांचा जाहीर लिलाव

By admin | Updated: November 9, 2016 02:01 IST

चंद्रपूर जिल्ह्यातील चार नगरपरिषदा व एक नगरपंचायतीच्या निवडणुका जाहीर झाल्या असून त्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने

ब्रह्मपुरी विभागातील प्रकार : कारवाईची मागणीकोठारी: चंद्रपूर जिल्ह्यातील चार नगरपरिषदा व एक नगरपंचायतीच्या निवडणुका जाहीर झाल्या असून त्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने १७ आॅक्टोबरपासून आदर्श आचार सहिता लागू केली आहे. यात वनविकास महामंडळातील वनोपजांचा होणारा जाहीर लिलाव रद्द करण्यात आला. मात्र ब्रह्मपुरी वनविभागात लिलाव घेण्यात आल्याने आचार संहितेचा भंग झाला असून संबंधितावर कारवाई करण्याची मागणी अनेक खरेदीदारांनी केली आहे.ब्रह्मपुरी विभागातील वनोपजाचा जाहीर लिलाव बल्लारपूर येथे २१, २२ व आक्टोबर घेण्यात आला. त्यात खरेदीदारांची संख्या अत्यल्प होती. उपस्थित खरेदीदारांची संख्या व आंचार संहिता लागू असल्याने लिलाव घेण्यात येवू नये अशी मागणी अनेकांनी केली. मात्र विभागीय व्यवस्थापकांनी मागणी धुडकावित लिलाव घेतला. तसेच ६ व ७ नोव्हेंबरला ब्रह्मपुरी स्थानिक कार्यालयांकडून वनोपजांचा लिलाव घेण्यात आला. जिल्ह्यात आचार संहिता लागू झाल्यानंतर वनविकास महामंडळाच्या पश्चिम चांदा वनप्रकल्प विभाग चंद्रपूर, मध्यचांदा वनप्रकल्प विभाग बल्लारपूर यांनी आॅक्टोबर व नोव्हेंबर मध्ये होणारे जाहीर लिलाव रद्द केले. त्यात अपवाद ब्रह्मपुरी वनप्रकल्प विभाग ब्रह्मपुरी आहे. जिल्ह्यात चार किंवा त्यापेक्षा जास्त नगर परिषदा, नगर पंचायतीच्या निवडणुका असल्यास संपूर्ण जिल्ह्याकरिता आदर्श आचार संहिता लागू करण्यात आल्याचे संदर्भ क्र. दोन मध्ये नमुद आहे. चंद्रपूर जिल्ह्यात बल्लारशाह, राजुरा, वरोरा, मूल या नगर परिषदा व सिंदेवाही नगर पंचायतीच्या निवडणुका आहेत. उपसचिव राज्य निवडणूक आयोगाप्रमाणे चंद्रपूर जिल्ह्यासाठी आचार संहिता लागू आहे. त्यामुळे संपूर्ण जिल्हाभर आचार संहितेचा प्रभाव असणार आहे. त्यामुळे प्रत्येक आगारात जावून लिलाव करणे शक्य नाही.स्थानिक खरेदीदारांचा तसेच याच नगर परिषदेच्या क्षेत्रातील खरेदीदारांचा सहभाग असणार असल्याने या काळात होणाऱ्या लिलावत आंचारसिंहतेचा भंग होवू शकतो. असे मत व्यक्त करीतअसेन विभागीय व्यवस्थापकांनी जाहिर लीलाव रद्द केले.ब्रह्मपुरी विभागीय व्यवस्थापकांनी राज्य निवडणूक आयोगाच्या पत्राला बेदखल करीत आॅक्टोबर व नोव्हेंबर मध्ये वनोपजाचा जाहीर लिलाव बल्लारपूर व ब्रह्मपुरीत घेवून आचारसंहितेचा भंग केल्याची प्रतिक्रिया खरेदीदारांनी व्यक्त करीत कारवाईची मागणी केली आहे.जिल्ह्यात नगर परिषदांच्या निवडणूका असून स्थानिक नगर परिषद क्षेत्रासाठी आचारसंहिता लागू आहे, अशी प्रतिक्रिया महाव्यवस्थापक एस. एस. डोळे यांनी ‘लोकमत’ला दिली. मात्र लिलावामुळे आचारसंहितेचा भंग आहे काय, यावर बोलण्याचे टाळले. (वार्ताहर)