शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
Latest Marathi News LIVE Updates: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकातामध्ये ED ची मोठी कारवाई
3
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, जाणून घ्या एका रात्रीचं भाडं
4
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
5
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
6
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
7
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
8
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
9
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
10
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
11
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
12
Food : आशियातील टॉप-५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची दोन 'रत्न'; एक तर आपल्या मुंबईतच! बहुतेक मुंबईकरांनाही माहीत नसेल...
13
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
14
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
15
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
16
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
17
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
18
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
19
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
20
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकातामध्ये ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वेस्थानक मार्गाच्या डांबरीकरणासाठी निधी द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2021 04:26 IST

खासदारांना दिले निवेदन मूल: कोरोना संसर्गामुळे रेल्वे काही काळासाठी बंद आहे, दरम्यान रेल्वे स्थानकाकडे जाणारा मार्ग खड्डेमय असल्यामुळे नागरिकांना ...

खासदारांना दिले निवेदन

मूल: कोरोना संसर्गामुळे रेल्वे काही काळासाठी बंद आहे, दरम्यान रेल्वे स्थानकाकडे जाणारा मार्ग खड्डेमय असल्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. रेल्वे बंद काळात रस्त्याची दुरूस्ती करण्यासाठी निधी उपलब्ध करून द्यावा आणि तत्काळ रस्त्याचे डांबरीकरण करण्यात यावे, अशी मागणी मूल नगरपालिकेच्या सदस्य ललिता फुलझेले यांनी क्षेत्राचे खासदार बाळू धानोरकर यांच्याकडे केली आहे.

मूल येथील रेल्वे स्थानकाकडे जाणारा मुख्य रस्ता पूर्णपणे खड्डेमय झालेला आहे. या मार्गावर अनेकदा डागडुजीचे काम करण्यात आले. मात्र काही दिवसातच रस्ता उखडून गेल्याने या मार्गावरून जाणाऱ्या नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. ऑटोने जाणाऱ्या प्रवाशांनाही आपला जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. सध्या कोरोना संक्रमणामुळे रेल्वे बंद आहे. परंतु सायंकाळी फिरणारे नागरिक या मार्गावरून मोठ्या प्रमाणावर ये-जा करीत असतात. यामुळे या मार्गाच्या डांबरीकरणासाठी निधी उपलब्ध करून, तत्काळ रस्त्याचे काम करण्यात यावे, अशी मागणी नगरसेविका ललिता फुलझेले यांनी केली आहे. यावेळी काॅंग्रेसचे तालुकाध्यक्ष घनश्याम येनुरकर, जिल्हा उपाध्यक्ष राकेश रत्नावार, महिला काॅंग्रेसच्या तालुकाध्यक्ष रूपाली संतोषवार, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक अखिल गांगरेड्डीवार उपस्थित होते.