शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
6
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
7
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
8
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
9
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
10
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
11
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
12
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
13
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
14
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
15
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
16
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
17
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
18
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
19
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
20
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
Daily Top 2Weekly Top 5

रखडलेला हुमन प्रकल्प मार्गी लागणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2019 23:21 IST

सिंदेवाही तालुक्यातील सिरकाडा गावाजवळ मागील ३६ वर्षांपासून सुरू असलेल्या हुमन सिंचन प्रकल्पाचे काम रखडले आहे. या प्रकल्पाला संजिवनी देण्याचे कार्य नागपुरातील जनमंच संस्था करणार आहे, अशी ग्वाही संस्थेचे अध्यक्ष प्रमोद पांडे यांनी शेतकऱ्यांशी बोलताना दिली. २३ सिंचन प्रकल्पाची शोधयात्रा हुमण प्रकल्पाला दाखल झाल्यानंतर ते बोलत होते.

ठळक मुद्देसिंचन शोधयात्रा दाखल : जनमंच संस्था करणार राज्य शासनाकडे पाठपुरावा

लोकमत न्यूज नेटवर्कवासेरा: सिंदेवाही तालुक्यातील सिरकाडा गावाजवळ मागील ३६ वर्षांपासून सुरू असलेल्या हुमन सिंचन प्रकल्पाचे काम रखडले आहे. या प्रकल्पाला संजिवनी देण्याचे कार्य नागपुरातील जनमंच संस्था करणार आहे, अशी ग्वाही संस्थेचे अध्यक्ष प्रमोद पांडे यांनी शेतकऱ्यांशी बोलताना दिली. २३ सिंचन प्रकल्पाची शोधयात्रा हुमण प्रकल्पाला दाखल झाल्यानंतर ते बोलत होते.हुमा नदीवर सन १९८२-८३ रोजी हुमन नदीवर हुमन प्रकल्पाचे भूमिपूजन झाले. त्यावेळी या प्रकल्पाची किंमत ३३ कोटी होती. नवरगाव, खांडला भागात कर्मचारी वसाहत तसेच हुमण प्रकल्पाचे काम सुरू करण्यात आले. चार वर्षे काम सुरू असतानाच अचानक बंद झाले. तेव्हापासून या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.दरम्यान, नागपुरातील जनमंच संस्थेची सिंचन प्रकल्प शोधयात्रा हुमण प्रकल्पाला दाखल झाल्यानंतर सन १९८२-८३ रोजी या परिसरातील शेतकºयांकडून माहिती जाणून घेतली. रत्नापूर येथील रामचंद्र गहाणे, सदाशिव मेश्राम, सरपंच रत्नापूर, उद्धव तोंडफोडे उपसरपंच, रमाकांत लोधे जि. प. सदस्य व अन्य शेतकºयांनी या प्रकल्पाची माहिती दिली. हुमण प्रकल्प सध्या कोणत्या स्थितीत आहे, प्रकल्प का रेंगाळता, पूर्णत्वास का जात नाही, याची कारणे शोधण्यासाठी जनमंच संस्थेने शोधयात्रा सुरू केली. हुमण प्रकल्प पूर्णत्वास जाण्याकरिता शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला जाणार आहे, अशी माहिती जनमंचाच्या पदाधिकाºयांनी दिली.सन १९८२-८३ मध्ये ३३ कोटीचा प्रकल्प २५०० कोटीवर पोहोचला. परंतु, शासन उदासिन आहे, असा निष्कर्ष संस्थने पाहणीदरम्यान काढला. २१८ कोटी रूपये आजपर्यंत खर्च करण्यात आले. बुडीत क्षेत्रात ३९ गावे बाधित झाली आहेत. त्यापैकी १५ गावे पूर्णत:, ८ गावे अशंत: आणि १६ गावांची जमीन बाधित झाली. हुमण प्रकल्पाम्मुळे सिंदेवाही, मूल, पोंभुर्णा व सावली तालुक्यातील शेतकºयांना सिंचनाचा लाभ होणार आहे. सिंचन शोध यात्रेत जनमंच संस्थेचे पदाधिकारी, गोसेखुर्द प्रकल्प संघर्ष समितीचे अ‍ॅड. गोविंद भेंडारकर, रमाकांत लोधे, जि.प. सदस्य मनोहर खोरगडे, जगताप, एस. सी. धकाते, उपविभागीय अभियंता व परिसरातील बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते.