शहरं
Join us  
Trending Stories
1
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
2
Latest Marathi News LIVE Updates: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकातामध्ये ED ची मोठी कारवाई
3
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
4
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, जाणून घ्या एका रात्रीचं भाडं
5
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
6
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
7
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
8
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
9
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
10
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
11
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
12
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
13
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
14
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
15
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
16
Food : आशियातील टॉप-५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची दोन 'रत्न'; एक तर आपल्या मुंबईतच! बहुतेक मुंबईकरांनाही माहीत नसेल...
17
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
18
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
19
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
20
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
Daily Top 2Weekly Top 5

गुणवत्ता मंडळामुळे विद्युत केंद्राची प्रगती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2019 22:13 IST

गुणवत्ता मंडळाच्या माध्यमातून समस्यांचे निराकरण झाल्यामुळे विद्युत केंद्राची प्रगती झाली असून कर्मचाऱ्यांचा कामाचा दर्जा वाढून उत्पादनात वाढ झाली. ही गौरवास्पद बाब आहे, असे प्रतिपादन मुख्य अभियंता जयंत बोबडे यांनी केले.

ठळक मुद्देजयंत बोबडे : गुणवत्ता विकास मंडळाचा वर्धापन दिन

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : गुणवत्ता मंडळाच्या माध्यमातून समस्यांचे निराकरण झाल्यामुळे विद्युत केंद्राची प्रगती झाली असून कर्मचाऱ्यांचा कामाचा दर्जा वाढून उत्पादनात वाढ झाली. ही गौरवास्पद बाब आहे, असे प्रतिपादन मुख्य अभियंता जयंत बोबडे यांनी केले.चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्रात गुणवत्ता मंडळाचा २५ वा वर्धापन दिन सोहळा नुकताच पार पडला. यावेळी ते अध्यक्षस्थानावरुन बोलत होते. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. सुरेंद्र गोळे, मानव संसाधन व्यवस्थापनचे विचारवंत उपमुख्य अभियंता अनिल आष्टिक, राजेश राजगडकर राजेश ओस्वाल, विजया बोरकर आदी उपस्थित होते. याप्रसंगी डॉ. सुरेंद्र गोळे यांनी व्यवस्थापन कौशल्य गुणवत्तेवर कशाप्रकारे आधारित आहे,याबाबत मार्गदर्शन केले. याप्रसंगी राजेंद्र पोइनकर व चमुनी स्वागतगीत सादर केले. त्यानंतर विविध स्पर्धा पार पडल्या. गुणवत्ता मंडळ स्पर्धेचे परीक्षक म्हणून कार्यकारी अभियंता जयप्रकाश बोवाडे, सविता फुलझेले व कनिष्ठ अभियंता मुरलीधर गोहणे यांनी काम पाहिले.प्रास्ताविक कार्यकारी अभियंता सुरेंद्र निशानराव, संचालन पल्लवी दुर्गे व स्नेहल पाटील तर आभार प्रिती येरेवार व बक्षीस वितरण कार्यक्रमाचे संचालन श्वेता दासरवार यांनी केले. यावेळी अनिल पुनसे, सुहास जाधव, पुरुषोत्तम उपासे, सुनील कुलकर्णी, कार्यकारी अभियंता जयप्रकाश बोवाडे, शालिक खडतकर, भेंडेकर, शितल मेश्राम, कार्यकारी अभियंता हेमंत ढोले, विष्णु पगारे, दिगांबर इंगले, सतीश पाटील, देवराव कोंडेकर, दिलीप कातकर, रोशनी ठाकरे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाला चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंदातील सर्व अधीक्षक अभियंते़, कार्यकारी अभियंते, कर्मचारी व गुणवत्ता मंडळाचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.